आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरविकास विभागाची 7 सप्टेंबरला आढावा बैठक:शासनाच्या विविध योजना, प्राप्त झालेला निधी, खर्च आदींची घेणार माहिती

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव 7 सप्टेंबर रोजी नागपूर महापालिकेत विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. यात शासनाच्या विविध योजना, प्राप्त झालेला निधी, खर्च आदींची माहिती घेणार आहेत.

मनपा कार्यालयात बैठक

राज्य शासन आणि राज्यातील विविध महापालिका प्रशासन यांच्यामधील समन्वय प्रभावी करुन कामकाजामध्ये अधिक गतीमानता आणण्याच्या हेतूने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर महापालिका कार्यालयात ही बैठक होत आहे.

विविध विषयांचा घेणार आढावा

या बैठकीत महापालिकांना राज्य शासनाकडून पाठवण्यात आलेले विविध प्रस्ताव त्यांची सद्यस्थिती यात आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम, आस्थापना विषयक इतर बाबी तसेच इतकर प्रशासकीय प्रस्ताव यांचा समावेश आहे. तसेच शासनाकडून विविध योजनांसाठी महापालिकांना दिला जाणारा निधी. प्राप्त झालेल्या निधीपैकी या निधीचा विनियोग, योजनेचे नेमके काय झाले? शासनाच्या विविध योजनांच्या अमंलबजावणीची सद्यस्थिती. याच बरोबर केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजना-1, अमृत योजना टप्पा-2 ,स्वच्छ भारत मिशन, केंद्रिय वित्त आयोग, स्मार्ट सिटी मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, एनउयएलएम. तर राज्य शासन पुरस्कृत योजनांपैकी नगरोत्थान अभियान, महापालिका मुलभूत सोयी सुविधा निधी आणि हद्दवाढ भागातील कामे आदी विविध विषयांचा आढावा घेतला जाणार आहे.

इमारतीच्या जागेचा प्रश्नही रखडला

या बैठकीला अकोला महापालिकेच्या आयुक्त कविता द्विवेदी उपस्थित राहणार आहे. महापालिकेचा आकृती बंध अद्याप मंजुर झालेला नाही. त्याच बरोबर प्रशासकीय इमारतीच्या जागेचा प्रश्नही रखडला आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या काही योजना रखडल्या

शहरात अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा आणि भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण झाले असले तरी सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण होवूनही हा प्रकल्प कार्यान्वित झाला नाही. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत खत निर्मिती प्रकल्पही कार्यान्वित झालेला नाही. त्याच बरोबर अमृत-2 चा डिपीआर अद्याप तयार करण्याचे काम पूर्ण झालेले नाही. या बैठकीत या विषयावर चर्चा होवून यापैकी रखडलेली कामे मार्गी लागतात. की, ही केवळ अन्य बैठकांसारखी आढावा बैठक ठरते. ही बाब येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

बातम्या आणखी आहेत...