आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रमांची ‎ ‎ रेलचेल:कवीकट्ट्यासह गझल कट्ट्याने रसिक‎ श्रोत्यांना साहित्य संमेलनात खिळवले‎‎

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाशीम रोडवरील प्रभात किड्स‎ स्कूल परिसरात साकारण्यात‎ आलेल्या स्व. बाजीराव पाटील ‎साहित्यनगरीत आयोजित दोन ‎दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य ‎ ‎ संमेलनात विविध कवी, लेखक, ‎रसिकांसाठी विविध दालने,‎ व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात ‎आले. दिवसभर येथे कार्यक्रमांची ‎ ‎ रेलचेल होती.‎ स्व. संतोष इंगळे स्मृती कवीकट्ट्यावर दिवसभरात तीन सत्र ‎झाले.

दुपारी एक ते चार वाजेपर्यंत ‎ विविध जिल्ह्यातील कवींनी‎ आपल्या रचना सादर केल्या.‎ अमोल गोंडचवर संयोजक होते.‎ साहित्यप्रेमी स्व. मंगेश गावंडे स्मृती‎ गझलकट्ट्यावरही कवी, रसिकांनी‎ दिवसभर गर्दी केली होती. एकाहून‎ एक सरस रचना सादर करत‎ गझलकारांनी टाळ्या मिळवल्या.‎ नीलेश कवळे हे संयोजक होते.‎

‎ ‎ येथेही दुपारी एक ते चार या वेळेत‎ तीन सत्र झाले.‎ स्व. नरेंद्र लांजेवार स्मृती पुस्तक‎ प्रकाशन कट्ट्यावर दिवसभरात‎ विविध पुस्तकांचे प्रकाशन‎ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.‎ सुमारे दहापेक्षा अधिक पुस्तकांचे‎ दिवसभरात प्रकाशन करण्यात‎ आले. साहित्यनगरीत स्व. प्रा. डॉ.‎ प्रदीप बोरकर स्मृती‎ संगीतकट्ट्याचेही आयोजन होते.‎ येथेही तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎ मिळाला. स्व. नीलेश म्हसाये स्मृती‎ वऱ्हाडीकट्टा येथे विदर्भातील‎ कवींनी रचना सादर करत रसिक‎ श्रोत्यांना खिळवून ठेवले.

बातम्या आणखी आहेत...