आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांनी दिली भेट; आर्थिक विकासात भर देणाऱ्या सूर्यफुल पिकाकडे वळावे : मुंडे

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूर्यफुल हे खाद्यतेल देणारे पीक अल्पशा खर्चात मोठे उत्पन्न देणारे पीक आहे. या पिकाच्या लागवडीचा खर्च व मजुरांची गरज कमी प्रमाणात लागते. त्यामुळे या पिकांवर थोडी मेहनत घेतल्यास मोठे उत्पन्न मिळते, असे प्रतिपादन कृषी उपसंचालक कृषी आयुक्तालय पुणे, जिल्ह्याचे पालक उपसंचालक एम.वाय. मुंडे यांनी केले.

सूर्यफुलाच्या तेलात लिनोलिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाणात राहते. त्यामुळे रक्तदाब, हृदयविकारावरही नियंत्रण ठेवण्यास मदत होते. सूर्यफुलाच्या लागवडीचे अनेक फायदे आहेत. शेतकऱ्याच्या आर्थिक विकासात भर देणारं पीक म्हणून सूर्यफुलाकडे पाहिलं जात. अशातच सूर्यफूल तेलाची मागणी, इतर उन्हाळी पिकाला पर्याय, कमी पाण्यात येणार पीक, वन्यजीव प्राण्याचा धोका कमी आणि उत्पन्नामध्ये जास्त भर देणाऱ्या या पिकाकडे शेतकरी वळत आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील व्याळा येथील युवा शेतकरी सागर बायस्कर यांनी उन्हाळी हंगामात सुर्यफुल पिकाची लागवड तीन एकर क्षेत्रावर केली असून सध्याच्या परिस्थितीत सूर्यफुल पीक वाढीच्या अवस्थेत आहे.

या प्रक्षेत्राला कृषी उपसंचालक कृषी आयुक्तालय पुणे तथा अकोला जिल्हाचे पालक उपसंचालक असलेले एम.वाय. मुंडे यांनी पाहणी करुन समाधान व्यक्त केले. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सूर्यफुल हे पीक कमीतकमी खर्चात येणारे पीक असून शेतकऱ्यांनी सूर्यफुल लागवडीकडे वळावे, असे आवाहन सुध्दा केले. यावेळी उपस्थिती म्हणून तालुका कृषी अधिकारी नंदकिशोर माने, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, कृषी सहाय्यक मनिष बाजड, युवा शेतकरी सागर बायस्कर व शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...