आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला:एक वर्षानंतर बेपत्ता मुलीचा शोध; अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला यश, 11 गुन्ह्यांचा उलगडा

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला आले यश

बेपत्ता प्रकरणात ताटातूट झालेल्यांची भेटगाठही या कक्षातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घडवून आणली. जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारी दाखल आहेत. वर्षानुवर्षांपासून या गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याची स्थिती होती. त्याची दखल घेत पोलिस अधीक्षक जी. श्रीधर व अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊन यांनी अनैतिक मानवी वाहतूक कक्षातील कामाला गती दिली.

महिला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३, ३६६ (अ) भादंवि तसेच महिला बेपत्ता असल्याच्या तक्रारींचा तपास करण्याचे आदेश दिले. अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने मागील दोन महिन्यांपासून तपासाला गती देत आजपर्यंत एकूण ११ गुन्हे व २ मिसिंग उघडकीस आणले आहे. असाच एका तक्रारीचा उलगडा करण्यात या कक्षाला यश आले आहे. बार्शीटाकळी पोलिस ठाणे येथे मार्च २०२० मध्ये भादंवि कलम ३६३ प्रमाणे तक्रार दाखल होती. या तक्रारीच्या अनुशंगाने ५ मार्च २०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतुक कक्षाकडे या तक्रारीचा तपास आला. त्यानंतर तपासाचे सूत्र फिरवल्यानंतर गुन्ह्यातील पीडित मुलगी ही आरोपीसोबत कल्याण येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार १९ मे रोजी पीडित मुलगी ही आरोपीसोबत वरखेड देवदरी ,बार्शीटाकळी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून अनैतिक मानवी वाहतुक कक्षाचे अधिकारी यांनी गुन्ह्यातील पीडित मुलगी आणि आरोपीला वरखेड देवदरी येथून ताब्यात घेतले. त्यानंतर पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस करून पुढील कार्यवाही करता त्यांना बार्शीटाकळी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक संजीव राऊत, सपोनि प्रिती ताठे, सपोनि महेश गावंडे, पोउपनि सुलभा ढोले, विजय खर्चे, सूरज मंगरुळकर, संजीव कोल्हटकर, पूनम बचे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...