आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामैत्रिणीने लॉजवर येण्यास नकार दिल्याने तिचे व्हिडीओ स्टेटसवर ठेवून सोशय मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. ही कारवाई शेगाव पोलिसांनी केली.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील एका युवकाची एका मुलीशी मैत्री होती. याचा गैरफायदा घेत त्याने या मुलीला शेगावला दर्शनासाठी बोलावले. त्याने मुलीला एका लॉजवर नेले, इथे बळजबरीनं तिच्यावर अतिप्रसंग केला. असेच कृत्य त्याने बरेचवेळा केले. या युवकाने व्हिडीओसुद्धा काढून ठेवला होता. त्यानंतर तो वारंवार या मुलीला शेगावला लॉजवर बोलवत होता. मात्र त्रासाला कंटाळलेल्या पीडित मुलीने लॉजवर येण्यास नकार दिला, त्यामुळे त्याने युवतीसोबतचे फोटो व व्हिडिओ आपल्या व्हॉटसअप स्टेटसवर ठेवून व्हायरल केला. याबाबत पीडित मुलीने शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन पोलिसांनी आरोपी युवका विरुद्ध कलम ३७६ (२), (एन) ५०६ भादंवी सहकलम ६७ (ए) २००६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या युवकाला काल अकोल्यातून शेगाव पोलिसांनी अटक केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.