आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता मध्यावधी होतील

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता मध्यावधी होतील, असे वाटते. १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात राजकीय अस्थिरता असल्याने राज्यातील राजकीय परिस्थिती बदलू शकते,’ असे मत काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. अकोल्यात माध्यमांशी ते बोलत होते.

थोरात म्हणाले की, काँग्रेस दोन टप्प्यात विभागलेली असेल, असे बिल्कूल काही होणार नाही. भाजपवाल्यांनी असे स्वप्नही पाहू नयेत. ते अशी स्वप्नं पाहतात, असं व्हावं, तसं व्हावं. काही होणार नाही. उलट भारत जोडो यात्रेमुळे देश जोडला जाणार आहे. जो भाजपला नको आहे. त्यांना भेद पाहिजे. आम्ही देश जोडण्याचे काम करतोय. भारतीय जनता पक्षाला भीती वाटतेय, त्यातूनच असे वक्तव्य येतात. नाना पटोले हे समर्थपणे अध्यक्षपद सांभाळत आहेत. त्यांना सर्व ज्येष्ठांचे आशिर्वाद आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांचाही त्यांना आशिर्वाद आहे.

शरद पवार यांनी ८ तारखेची वेळ दिली होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन-चार दिवस इकडे-तिकडे होईल, मात्र ते यात्रेत निश्चित सहभागी होतील. उद्धव ठाकरेही यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यांचा कार्यक्रम लवकरच येईल. चंद्रकात खैरे यांनी वक्तव्य केलं आणि मागे घेतल आहे. त्यामुळे यावर आता चर्चा करण्यात अर्थ नाही, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी,

बातम्या आणखी आहेत...