आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवंश:कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या गोवंशाला जीवनदान

अकोटएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या एका गोवंशाला अकोट शहर पोलिसांनी जीवदान दिले आहे. ही कारवाई शहरातील कांगरपुरा परिसरात गुरुवार, १२ मे रोजी करण्यात आली. अकोट शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांना शहरातील कांगरपुरा येथे एका व्यक्तीच्या घरी एक गोवंश कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली असता सै. शराफत अली सै. शरीफ अली रा. कांगरपूरा याच्या घरी एक गोवंश बांधून ठेवल्याचे दिसून आले. आरोपीजवळ गोवंशाबाबत कोणतेही कागदपत्रे मिळून आले नाहीत. गोवंशाची सुटका करीत आरोपीविरुद्ध कलम ५ अ, ५ ब, ९,११, सहकलम ११ (च), (ज), (झ) प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रति. अधि. १९६० नुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अकोट शहरचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अख्तर शेख, पोहेका उमेशचंद्र सोळंके, पोका. उमेश पराये, मनीष कुलट, सागर मोरे, मपोका गीता भांगे यांनी केली.