आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन जणांना अटक:दाेन गाेवंशांना जीवनदान; 2 क्विंटल गाेमांसही जप्त ; विशेष पथकाची दाेन ठिकाणी कारवाई

अकाेला21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गाेवंशांची अवैध वाहतूक थांबण्याचे नाव घेत नसून, पाेलिसांच्या विशेष पथकाच्या कारवाईमुळे रविवारी दाेन गावंशांना जीवनदान िमळाले. तसेच २०० किलाे गोमांसही जप्त करून तीन आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.जिल्ह्यात गाेवंशाची अवैध वाहतूक थांबत नसल्याचे ११ सप्टेंबरला दिसून आले. एका चारचाकी वाहनातून कत्तलीसाठी अवैधरीत्या गाेवंशांची वाहतूक होत असल्याची माहिती पाेलिस अधीक्षकांच्या विशेष पथकास मिळाली. पथकाने जनता भाजी बाजारनजीक नाकाबंदी केली. या ठिकाणी एमएच २० एलएल ५०१६ हे वाहन पथकातील पाेलिसांनी थांबवले. यात दाेन गाेवंश दिसून आले. विनापरवाना वाहतूक हाेत असल्याचेही समाेर आले. दाेन्ही गाेऱ्यांच्या अंगावर जखमाही हाेत्या. या वेळी विकास लक्ष्मण लवारे (वय ३०, रा. शिवनी) याच्याकडून ५ लाख रुपये किमतीचे वाहन आणि ९० हजारांचे दाेन गाेऱ्हे असा ५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

येथे केली दुसरी कारवाई बार्शीटाकळी येथून अवैधरीत्या कत्तल करून गोमांस खदान परिसरात विक्रीसाठी आणण्यात येत असल्याची माहिती पाेलिसांच्या विशेष पथकाला मिळाली हाेती. पथकाने खदान नाका परिसरात नाकेबंदी करून एमएच ३० पी ७५४१ या क्रमांकाचे वाहन थांबवले. वाहनाची तपासणी केली असता त्यात २०० किलाे गाेमांश आढळून आले. कत्तल केल्यानंतर हे मांस जमा करण्यात आले हाेते. पाेलिसांनी ४० हजार रुपये किमतीचे गाेमांस व २ लाख रुपयांचे वाहन असा एकूण २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जमशेद खान जफरखान (वय ५०) व शेख रहमान शेख अजीज (वय ४५, दाेघेही रा. बार्शीटाकाळी) याच्याकडून जप्त केला. याप्रकरणी आरेपींविरुद्ध खदान पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...