आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडी:बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी, दहीहंडी उत्साहात

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जठारपेठेतील बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग तिसरीची विद्यार्थिनी अन्वया नीलेश पाकदुने व ऋग्वेदा अरविंद उगले यांनी केले. श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत झाले. सर्व प्रथम ‘श्री विष्णूचे अवतार’ ही नाटिका सादर करण्यात आली. नाटिकेचे सूत्रसंचालन देवश्री दत्तात्रय कराळे आणि शाल्मली विवेक देशपांडे यांनी केले.

अद्वैत प्रवीण गायकवाड, ओजस अमोल माडीवाले, अभिराम जयआशिष जोशी, कुशल विवेक चापके, स्वर समीर थोडगे, आदिश मयूर देशमुख, तन्मय सचिन ताडे, आरव विनोद भालतिलक, आस्था संतोष गेबड, सोहम सुनील कराळे, अवनिश मुकेश निचळ, रुद्राक्ष अक्षय कुळकर्णी आदींनी नाटिकेत भाग घेतला. श्रीहरी स्तोत्रातून विद्यार्थ्यांनी श्री विष्णू स्तुती सादर केली. देवकीचे पुत्र वियोगाचे दुःख आपल्या स्वगतातून गिरीजा सुयोग रानडे हिने उत्तमरित्या सादर केले. सर्व विद्यार्थिनींनी ‘कान्हा सो जा जरा’ या गीतावर बहारदार नृत्य सादर केले. ‘पुस्तकांशी मैत्री करून मोबाइलला दूर ठेवा’ असा संदेश प्रमुख अतिथी बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या सह. शिक्षिका कीर्ती खपली यांनी दिला. सर्व विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा कलाविष्कार सादर केला. कार्यक्रमासाठी वर्ग शिक्षिका अश्विनी पांडे, मीनाक्षी जोशी, साक्षी सहस्रबुद्धे, रागिणी बक्षी, नृत्य शिक्षिका नंदिनी बोडसे, संगीत शिक्षक पुरुषोत्तम कोरान्ने यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...