आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनेरी झळाळी:अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नाणी, अंगठ्या, बिस्किटांना यंदा होती सर्वाधिक मागणी, सोन्याची विक्रमी उलाढाल

अकोला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीचे महत्त्व आहे. या मुहूर्तावर खरेदी केलेली संपत्ती अक्षय राहते, असे समजले जाते. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षानंतर मनाप्रमाणे अक्षय तृतीयेचा सण साजरा करता येत असल्याने सोने-चांदीच्या दरात चढ-उतार असतानाही दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे यंदा आठ कोटींची उलाढाल झाली कोरोनानंतर ‘अक्षय’ गुंतवणुकीकडे कल वाढल्याने सोन्याची विक्रमी उलाढाल झाली.

कठीण काळात सोनं जेवढ कामी येत, इतर कोणत्याही गुंतवणुकीतून तेवढा फायदा मिळत नाही. याच विश्वासातून कोरोना महामारीनंतर लोकांचा सोने खरेदीचा मोह वाढला आहे. आतापर्यंत इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक केलेले लोक आता पुन्हा सोन्याला अधिक प्राधान्य देत आहेत. शेअर बाजारावर जागतिक तणावासह इतर घटकांच्या मोठ्या प्रभावामुळे, गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानतात. त्यामुळे यंदा अक्षय तृतीयेला सोन्यामध्ये विक्रमी उलाढाल झाली आहे.

लग्नसमारंभासाठी सोन्याची जास्त खरेदी आपल्याकडे लग्न समारंभात सर्वाधिक सोने खरेदी करतात. एकूण सोन्यापैकी ६५-७० टक्के सोने सण किंवा लग्नाच्या निमित्ताने खरेदी केले जाते. इतर प्रसंगी केवळ ३०-३५ टक्केच खरेदी केले जाते. ४१ टक्के लोक केवळ लग्नसोहळ्याच्या निमित्ताने सोने खरेदी करतात, तर ३१ टक्के लोक कोणत्याही विशेष प्रसंगाशविाय सोने खरेदी करतात, असे इंडिया गोल्ड पॉलिसी सेंटरचा अहवाल सांगतो, अशी माहिती या वेळी सराफा विक्रेत्यांनी दिली.

मध्यमवर्गीयांमध्ये सर्वाधिक क्रेझ
ज्यांचे वार्षिक उत्पन्न २ ते १० लाख आहे, त्यांनी सोने खरेदी केली. मध्यमवर्गीय लोक उपलब्ध सोन्याच्या ५६ टक्के खरेदी करतात. याचे कारण गुंतवणुकीसाठी हा सुरक्षित पर्याय मानला जातो. १० लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेले उच्च मध्यम वर्गीय, श्रीमंत लोक भांडवली नफ्यासाठी त्यांचे अतिरिक्त भांडवल सोन्यात गुंतवतात, अशी माहिती या वेळी मिळाली.

बातम्या आणखी आहेत...