आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भावभोळ्या मन:प्रवृत्तीचे‘गोपाळा रे गोपाळा’

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वभावाने भोळे, सरळ-साधे व्यक्ती बरेचदा समाजात विनोदाचा विषय ठरतात. पण मनाने स्वच्छ, अंतरंगाने निर्मळ व्यक्ती प्रेमात पडल्यास काय होते, याच करूण प्रेमरसाची कथा ‘गोपाळा रे गोपाळा’ नाटकातून मांडण्यात आली आहे. अकोल्यातील अंतरंग फाउंडेशनकडून ही नाट्यकृती शनिवारी सादर करण्यात आली.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ६१ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अकोला-अमरावती जिल्ह्यातील प्राथमिक फेरी प्रमिलाताई ओक सभागृहात सुरू आहे. ‘गोपाळा रे गोपाळा’ या दोन अंकी नाटकात गोपाळाची भूमिका विवेक वडशिंगीकार यांनी विनोदी संवाद व प्रभावी देहबोलीतून सक्षमपणे मांडण्याचा प्रयत्न केला. याशिवाय कलाकृतीमध्ये रंगा-राजेश तराळे, आई-उज्ज्वला कांबळे, मीरा वृषाली मानकर, पत्रकार-डॉ. राजू देशपांडे यांनी पात्र साकारली.

ड्राव्हर, मामा, यमीचे वडील, पूजारी, मॅरेज काॅन्ट्रॅक्टर यांच्या व्यक्तीरेखा सागर लाहोळकर यांनी कौशल्याने उभ्या केल्या. सहायक कलाकारांमध्ये मोनिका ददगाळ, मयूर राठोड, वैभव पल्हाडे, पद्मनाथ पांडे आदी होते. नाटकाचे दिग्दर्शक वडशिंगीकार व लेखक हेमंत एदलाबादकर यांनी केले. नृत्य दिग्दर्शक शीतल ददगाळ, प्रकाश योजना आनंद जहागीरदार, ध्वनी संकलन श्रीनिवास गावपांडे, नेपथ्य राजेश तऱ्हाळे, रंगभूषा आणि वेशभूषा उज्ज्वला कांबळे यांनी सांभाळली. या नाट्य स्पर्धेचे समन्वयन सचिन गिरी, जय ठाकूर आणि मंदार घेवारे करत आहेत. स्पर्धेचे परीक्षक गुरू वठारे सोलापूर, रवींद्र सावंत कल्याण आणि किशोर डाऊ नागपूर करत आहेत. प्रेक्षकांमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळे, मधू जाधव, प्रा. डॉ. ममता इंगोले, विद्या बनाफर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. नाट्य स्पर्धेत रविवारी शेवटचे नाटक सादर करण्यात येईल.

आजचे नाटक ४ डिसेंबर: वळण, संस्था : अंकुर साहित्य संघ लेखक : गजानन छबिले दिग्दर्शक : सचिन पाटील स्थळ : प्रमिलाताई ओक सभागृह, वेळ: सायंकाळी ७ वाजता.

बातम्या आणखी आहेत...