आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात गाेसेवा आयाेग स्थापन करा:गोशाला महासंघाची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
आरडीसींना निवेदन सादर करताना गाेशाला महासंघाचे पदाधिकारी व अन्य. - Divya Marathi
आरडीसींना निवेदन सादर करताना गाेशाला महासंघाचे पदाधिकारी व अन्य.

अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही गोसेवा आयोग स्थापन करावे, अशी मागणी गाेशाला महासंघातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संज यांच्ययाकडे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात महासंघातर्फे मागणीच्या समर्थनार्थ हातात फलक घेऊन हा मुद्दा लावून धरण्यात आला.

राज्यात सध्या 950 गोशाळा सुरू

महाराष्ट्र राज्यात सध्या लहान मोठ्या 950 गोशाळा सुरू असून या गोशाळेत वृध्द, भाकड, अपंग, अपघातग्रस्त, आजारी व अनाथ गोवंशाचे पालन पोषन व सांभाळ होत आहे. अवैध कत्तलीसाठी घेऊन जातांना पोलिसांकडून पकडण्यात येत असलेले गोवंशही याच गोशाळांमध्ये रक्षण, संवर्धन व उपचाराकारीता पाठविण्यात येतात. जवळपास 2 लाख गोवंशाचे संगोपन गोरक्षण संस्था कोणत्याही शासकीय मदतीशिवाय करीत आहेत.

गोशाळा ट्रस्टी व गोसेवकांतर्फे निवेदन

भारतातील अन्य राज्यात गोशाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्या-त्या राज्यांनी राज्य गोसेवा आयोग स्थापन केले आहे. याच धरतीवर महाराष्ट्र सरकार ने पण महाराष्ट्रात गोसेवा आयोग निर्माण करावा, यासाठी जिल्ह्यातील गोशाळा ट्रस्टी व गोसेवकांतर्फे निवेदन देण्यात येत आहे. यावेळी अ‍ॅड. माेतिसिंह माेहता, गजानन बाेराळे, सुभाष जैन, डाॅ. सुनील सुर्यवंशी, प्रकाश वाघमारे, श्रीकांत बाेरकर, तुळशीराम मसने आदी उपस्थित हाेते.

अन्य राज्यात मिळते आर्थिक मदत

गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश,हरियाना, पंजाब, कर्नाटक, दिल्ली व अन्य राज्यात गाेसेवा आयाेग आहे येथील गोशाळांना संबंधित राज्य सरकारने आर्थिक मदत देवून सक्षम व परिपूर्ण बनविल्या आहेत. तेथील स्थािनक जातीचे गोवंशाचे संवर्धन व रक्षण करण्याचे कार्यही त्या राज्यात हाेत आहे. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे. या राज्यात शेती, पर्यावरण व रोजगार यांचा समतोल राखण्यासाठी देशी व स्थानिक जातीच्या गोवंशाचे रक्षण व संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे, असे गाेशाला महासंघाचे म्हणणे आहे.

गोवंशाचे संवर्धन करणे काळाची गरज

महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांची आर्थिक समृध्दी व ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती करण्यासाठी देशी गोवंशाचे संवर्धन करणे ही आजच्या काळाची गरज आहे. रासायानिक खत व किट नियंत्रकांमुळे शेती व पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. भेसळ युक्त दुग्ध-पदार्थाचा मानवाच्या आराेग्यावर परिणाम हाेत आहे. महाराष्ट्रामधील या प्रमुख सहा जातीच्या गोवंशाच्या रक्षण व संवर्धनासाठी महाराष्ट्रामध्ये गोसेवा आयोग निर्माण होणे आवश्यक आहे, असे गाेशाला महासंघाचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...