आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास पैसाच शिल्लक राहणार नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्याचे तीव्र पडसाद शनिवारी अकाेल्यात उटमले. भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी अस्मितेचा अपमान केल्याचा आरोप करीत शिवसेनेने गांधी चाैकात आंदाेलन केले. शिवसैनिकांनी घाेषणा देत भाजपवर टिकास्त्र डागले.
महाराष्ट्रामध्ये विशेषत: मुंबई आणि ठाण्यामधून गुजराती आणि राजस्थानी लोकांना इथून काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटले जाते ते आर्थिक राजधानी म्हटले जाणार नाही, असे राज्यपाल एका कार्यक्रमात म्हणाले हाेते. या वक्तव्यानंतर राज्यभरातून टीकेचा भडीमार हाेत आहे.
वाहतूक कोंडी
दरम्यान, 30 जुलै राेजी दुपारी राज्यपालांच्या उपराेक्त विधानाविराेधात शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी अकाेल्याचा मध्यवर्ती भाग असलेल्या गांधी चाैकात धाव घेतली. हातात निषेधाचा फलक व भगवा झेंडा घेत घाेषणा दिल्या. या आंदाेलनामुळे काही वेळ गांधी चाैकात वाहतुकीची काेंडी झाली हाेती. पोलिसांनी आंदाेलनस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. आंदाेलनात अकाेला पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, पूर्वचे प्रमुख अतुल पवनीकर, उपजिल्हाप्रमुख मंगेश काळे, पंकज जायले, अविनाश माेरे, गजानन बाेराळे, नितीन मिश्रा, अनील परचुरे, रुपेश ढाेरे आदी सहभागी झाले हाेते.
मुंबई महाराष्ट्रापासून ताेडण्याचा डाव
मराठी माणसाने आपले रक्त सांडून मिळवलेली मुंबई महाराष्ट्रपासून ताेडण्याचे प्रयत्न हाेत असल्याचा आराेप शिवसेनेचे अकाेला पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा यांनी केले. मुंबई, महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसचे सर्वाधिक याेगदान आहे. राज्यपाल हे मानाचे व घटनात्मक पद आहे. त्यांनी खुर्चीचा, त्या पदाचा मान ठेवणे आवश्यक आहे, असेही मिश्रा म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.