आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय कार्यालयांना सलग तीन दिवस सुटी:कामकाज कोलमडण्याची शक्यता, नागरिक त्रस्त

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय कार्यालयांना 26 ऑगस्टपासून सलग तीन दिवस सार्वत्रिक सुट्या आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयांचे सलग तीन दिवस कामकाज ठप्प राहणार आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिक मात्र त्रस्त होणार आहे.

ऑगस्ट महिना हा सणांचा महिना आहे. या महिन्यात विविध सण आहेत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात शनिवार-रविवार व्यतिरिक्त अन्य सुट्या येतात. मागील आठवड्यात 13 ते 16 ऑगस्ट अशा सलग चार सुट्या आल्या. आता 26 ऑगस्ट रोजी पोळा सण साजरा केला जात आहे. पोळा सणाला शासनाकडून सुटी जाहीर करण्यात आली नसली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात ही सुटी जाहीर केली आहे.

19 दिवस कामकाज

शुक्रवारी पोळ्याची सुटी तर शनिवार आणि रविवार आल्याने पुढील दोन दिवस सलग सुट्या आल्या. त्यामुळे सलग तीन दिवस कामकाज ठप्प राहणार आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यातील 31 दिवसांमधील 12 दिवस सुट्यांमध्ये गेले. परिणामी या महिन्यात खऱ्या अर्थाने 19 दिवस कामकाज होईल. या महिन्यात 12 दिवस सुट्या आल्याने सर्व सामान्य नागरिकांची शासकीय कार्यालयातील विविध कामे रेंगाळली आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांवर या सुट्यांचा अधिक परिणाम झाला आहे.

आदीबाबत तक्रारी

सर्व सामान्य नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जन्म-मृत्यू दाखला, घराच्या बांधकामाचा नकाशा, व्यावसायीक परवाना, अतिरिक्त आलेले पाणीपट्टी देयक कमी करणे, मालमत्ता कराचा भरणा, पाणीपट्टीचा भरणा यासह तुंबलेली नाली, साचलेला कचरा आदीबाबत तक्रारी करतात. या महिन्यात सलग सुट्यामुळे आणि आलेल्या सलग सुट्यामुळे कर्मचाऱ्यांनी लागून घेतलेल्या सुट्या यामुळे सर्व सामान्य नागरिकांची अनेक कामे रेंगाळली आहेत. विशेष म्हणजे 31 ऑगस्ट रोजी पुन्हा सुटी आली आहे. तर त्याच आठवड्यात गौरीचे आगमन होत असल्याने पुन्हा सुटी. या प्रकारामुळे सर्व सामान्य नागरिकांची महत्वाची कामे रेंगाळल्याने सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...