आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:ग्रा. पं. निवडणुकीत आचारसंहितेचे काटेकारपणे पालन व्हावे ; अरोरा

अकोला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आचारसंहिता कालावधीत निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रा. पं. निवडणूक आचारसंहितेसंदर्भात सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, बीडीआेंची संयुक्त बैठक नियोजन भवनात पार पडली. या बैठकीस जि. प.चे सीईओ सौरभ कटियार, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, एसडीओ डॉ. रामेश्वर पुरी, अभयसिंह मोहिते, डॉ. नीलेश अपार, आरडीसी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार आदी उपस्थित होते.

या वेळी संजय खडसे यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. त्यांनी आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबाबत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे वाचन केले. जाहीर कार्यक्रम, सभा यांच्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी प्रत्येक तालुकानिहाय पथके तयार करावीत. प्रत्येक तालुक्यात ग्रामपातळीवरील यंत्रणेची बैठक घेऊन माहिती द्यावी. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून निवडणूक आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिले.

बातम्या आणखी आहेत...