आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेंद:पदवीधर मतदार नोंदणीची मुदत वाढली;  मतदारयादी प्रकाशनानंतरही हाेणार नाेंद

अकोला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती विभाग पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करण्याची मुदत निश्चित असली तरी अंतिम यादी जाहीर झाल्यानंतरही नाेंदणी करता येणार आहे. बुधवारी २३ नोव्हेंबर रोजी प्रारुप यादी आिण ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर हाेणार आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक हाेणार आहे. काही दिवसांपासून मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. नाेंदणीची मुदत साेमवार ७ नोव्हेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनामार्फत मतदार नोंदणीकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. त्यासाठी क्षेत्रनिहाय सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा पदनिर्देशित अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. महापालिका, नगरपालिका, ग्रामीण व तालुका क्षेत्रातील मतदारांचे अर्ज नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडे व संगणकीय प्रणालीमध्‍ये नोंदणी करण्याची सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली होती. गत दोन दिवसांपासून शासकीय सुटीच्या दिवशीही अर्ज स्वीकारण्यात येत होते. आता मतदार नोंदणी यापुढेही करता येणार आहे.

असे आहे नियाेजन : भारत निवडणूक आयोगाच्या मंगळवार १ नोव्हेंबर २०२२ या अर्हता तारखेवर आधारित अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत ७ नोव्हेंबर पर्यंत दावे स्वीकारण्याचे निश्चित हाेते. तथापि याच कार्यक्रमाअंतर्गत बुधवार २३ नोव्हेंबर पर्यंत प्रारुप मतदार यादीची प्रसिद्धी झाल्यानंतर बुधवार २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत पुन्हा दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून या काळात सुद्धा पदवीधर मतदार संघाची मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही, निरंतर मतदार नोंदणी निवडणुकीसाठी उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत करता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...