आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात ग्राम पंचायतींच्या निवडणुकीसाठीच्या प्रचार ताेफा शुक्रवारी संध्याकाळी थंडावला. आता छुप्प्या पद्धतीने भेटी-गाठी सुरू झाल्या असून, चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी भेटीगाठींना प्राधान्य देत आहेत.
सरपंच पदाच्या 258 जागांसाठी आणि सदस्य पदाच्या एक हजार 354 जागांसाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत तीन लाख 10 हजार 249 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून चार हजार 235 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण मतदान केंद्र 832 असून त्यातील संवेदनशील मतदान केंद्र 179 आहेत. 3 लाख 8 हजार 317 मतदार हक्क बजावणार आहेत.
मंगळवारी मतमोजणी
गत दाेन वर्षे काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी काही दिवस निर्बंध होते. तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विविध याचिकांमुळे जानेवारी 2021 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका टप्प्या-टप्प्याने घेण्यात आल्या. त्यानंतर आता रविवारी मतदान हाेणार असून, सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतमाेजणी मंगळवारी होणार आहे.
येथे हाेणार निवडणूक
ग्राम पंचायत निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या 679 असून त्यातून 1474 सदस्यांची निवड हाेणार आहे. एकूण 265 ग्रा.प.मध्ये मतदान हाेणार आहे. यात तेल्हारा तालुक्यात 23, अकोट- 36, मूर्तिजापूर- 51, अकोला- 54, बाळापूर 26, बार्शीटाकळी- 47 तर पातूर तालुक्यातील 28 ग्राम पंचायतचा समावेश आहे.
एकूण 571 सदस्य हे अविरोध ठरले आहेत, 29 ठिकाणी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. जिल्ह्यात एकूण अविरोध प्रभागांची संख्या 138 आहे. सरपंच वगळता 5 ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य अविरोध झाले आहेत. त्यात तेल्हारा- 1, अकोट- 1, अकोला- 3 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सरपंचपदासाठी 258 ठिकाणी निवडणूक
सरपंचपदासाठी 258 जागांवर निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार अविरोध ठरले असून चार ठिकाणी सरपंचपदाकरीता एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झालेला नाही. एकंदर सरपंच व सदस्य असे मिळून 1695 जण निवडणूक रिंगणात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.