आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात 179 केंद्र संवेदनशील:ग्रामपंचायत निवडणूक; प्रचार ताेफा थंडावल्याने आता छुप्या भेटीगाठींना जोर

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात ग्राम पंचायतींच्या निवडणुकीसाठीच्या प्रचार ताेफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या. आता छुप्प्या पद्धतीने भेटी-गाठी सुरू झाल्या असून, निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहाेचवण्यासाठी भेटीगाठींना प्राधान्य देत आहेत. सरपंचपदाच्या २५८ जागांसाठी आणि सदस्यपदाच्या एक हजार ३५४ जागांसाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत तीन लाख १० हजार २४९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, चार हजार २३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण मतदान केंद्र ८३२ असून, त्यातील संवेदनशील मतदान केंद्र १७९ आहेत. ३ लाख ८ हजार ३१७ मतदार हक्क बजावणार आहेत.

गत दाेन वर्षे काेराेना िवषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी काही िदवस िनर्बंध हाेते. तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विविध याचिकांमुळे जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका टप्प्या-टप्प्याने घेण्यात आल्या. त्यानंतर आता रविवारी मतदान हाेणार असून, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतमाेजणी मंगळवारी होणार आहे.

४,२३५ उमेदवार निवडणूक रिंगणात जिल्ह्यात सरपंचपदाच्या २५८ जागांसाठी आणि सदस्यपदांच्या एक हजार ३५४ जागांसाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीत तीन लाख १० हजार २४९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, चार हजार २३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

येथे हाेणार निवडणूक ग्रामपंचायत निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या ६७९ असून, त्यातून १४७४ सदस्यांची निवड हाेणार आहे. एकूण २६५ ग्रा.पं.मध्ये मतदान हाेणार आहे. यात तेल्हारा तालुक्यात २३, अकोट- ३६, मूर्तजिापूर-५१, अकोला-५४, बाळापूर २६, बार्शीटाकळी-४७ तर पातूर तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

एकूण ५७१ सदस्य हे बिनविरोध ठरले आहेत, २९ ठिकाणी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. जिल्ह्यात एकूण बिनविरोध प्रभागांची संख्या १३८ आहे. सरपंच वगळता ५ ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत. त्यात तेल्हारा-१, अकोट-१, अकोला-३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...