आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या ठरणार गावाचे कारभारी:ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, 4 हजार 803 उमेदवारांची धाकधूक वाढली

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात झालेल्या सत्तांतणानंतर दुसऱ्यांदा थेट सरपंचपदासह ग्राम पंचायत सदस्यत्वासाठीच्या निवडणुकीतील मतमाेजणी मंगळवारी हाेणार आहे. याबाबत साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयालयतील गाेदामातील मतमाेजणी प्रक्रियेत सहभागी हाेणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक झाली. तहसीलदारांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतमाेजणीबाबत सूचना दिल्या.

यंदा प्रथमच जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने मतदानापूर्वीच सरपंचपदाचे उमेदवार जाहीर केले हाेते. त्यामुळे अध्यक्षा, उपाध्यक्ष चारही सभापतींसह पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कस लागला असून, उमेदवार व समर्थकांची धाकधूक वाढली आहे. निवडणुकीत एकूण 1 हजार 732 जागांसाठी 4 हजार 803 उमेदवार रिंगणात हाेते. एकूण 80.28 टक्के मतदान झाले हाेते.

प्रत्येक तालुक्यात हाेणार मतमाेजणी

ग्राम पंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी मतमाजेणी हाेणार आहे. ही प्रक्रिया तेल्हारा येथे नवीन तहसिल कार्यालय, गाडेगाव रोड. अकोट- नवीन तहसिल इमारत, पोपटखेड रोड. मूर्तिजापूर- नवीन शासकीय धान्य गोदाम. अकोला- शासकीय धान्य गोदाम, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर. बाळापूर- शासकीय धान्य गोदाम. बार्शीटाकळी- पंचायत समिती सभागृह आणि पातूर येथील तहसिल कार्यालयात पडणार आहे.

असे झाले मतदान

ग्राम पंचायत निवडणुकीत एकूण 3 लाख 7 हजार 640 मतदारांपैकि 2 लाख 46 हजार 973 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला हाेता. यात पुरुष 1 लाख 32 हजार 86 तर 1 लाख 14 हजार 884 महिलांनी मतदारांचा समावेश हाेता.

या दिग्गजांच्या क्षेत्रातील लढतीकडे लक्ष

जिल्हा परिषद अध्यक्षा संगिता अढाऊ यांच्या तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बु. मतदारसंघात तळेगाव, भाेकर येथे ग्रा. प. निवडणूक झाली असून, येथील सरपंच पदाचे उमेदवारी वंचितने आधीच जाहीर केले आहेत.

उपाध्यक्ष सुनील फाटकर यांच्या पातूर तालुक्यातील बाभूळगाव येथे, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे यांच्या सर्कलमधील शेळद, महिला व बाल कल्याण सभापती रिजवाना परवीन, शिक्षण सभापती माया नाईक यांच्या सिरसाेसर्कलमधील नवसाळ येथे आणि वंचितचे गट नेते ज्ञानेश्वर सुलताने यांच्या बाभुळगाव यांच्या सर्कलमधील सरपंच पदाचा उमेदवार वंचितने जाहीर केला आहे.

वाहतूक मार्गात बदल

  • जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मतमाेजणी हाेणार असल्याने वाटिका चाैक ते सरकारी बगिचा या मार्गावरील वाहतूक खालेश्वर, कालंका माता मंदिर, न्यू राधा किसन प्लाॅट, अग्रवाल हाॅटेल, सर्वाेपचार रुग्णालय या मार्गाने वळविण्यात आली आहे.
  • सर्वाेपचार रूग्णालय ते जिल्हाधिाकरी कार्यालय, पं.स.कडे जाणार वाहतूक अग्रवाल हाॅटेल, कालंका माता मंदिर, पंचायत समिती मार्गाने वळविण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...