आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात झालेल्या सत्तांतरानंतर दुसऱ्यांदा थेट सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यत्वासाठीच्या नविडणुकीतील मतमाेजणी मंगळवारी २० डिसेंबरला हाेणार आहे. याबाबत साेमवारी १९ डिसेंबरला िजल्हाधिकारी कार्यालयातील गाेदामातील मतमाेजणी प्रक्रियेत सहभागी हाेणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक झाली. तहसीलदारांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतमाेजणीबाबत सूचना दिल्या. यंदा प्रथमच िजल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने मतदानापूर्वीच सरपंचपदाचे उमेदवार जाहीर केले हाेते.
त्यामुळे अध्यक्षा, उपाध्यक्ष, चारही सभापतींसह पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कस लागला असून, उमेदवार व समर्थकांची धाकधूक वाढली आहे. या नविडणुकीत एकूण १ हजार ७३२ जागांसाठी ४ हजार ८०३ उमेदवार रिंगणात हाेते. एकूण ८०.२८ टक्के मतदान झाले हाेते.
गत दाेन वर्षे काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी काही िदवस िनर्बंध हाेते. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विविध याचिकांमुळे जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या नविडणुका टप्प्या-टप्प्याने घेण्यात आल्या. रवविारी मतदानानंतर आता मंगळवारी िनकाल जाहीर हाेणार आहे.
जिल्ह्यातील सात तालुक्यात हाेणार मतमाेजणी ग्रामपंचायत नविडणुकीसाठी मंगळवारी मतमाजेणी हाेणार आहे. ही प्रक्रिया तेल्हारा येथे नवीन तहसील कार्यालय, गाडेगाव रोड. अकोटला नवीन तहसील इमारत, पोपटखेड रोड. मूर्तिजापुरात नवीन शासकीय धान्य गोदाम. अकोल्याला शासकीय धान्य गोदाम, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर. बाळापूरला शासकीय धान्य गोदाम.
८२ टेबलावर होणार मतमोजणी जिल्ह्यातील ७ तालुक्यात ८२ टेबलवर २७८ कर्मचारी ग्रा.पं. नविडणुकीची मतमाेजणी करणार आहे, अशी माहिती नविासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात मतमाेजणीसाठी १२ टेबलवर व्यवस्था केली. तेल्हारा ः १२, मूर्तिजापूर ः १५ , बाळापूर ः ९, अकोट ः १२, बार्शीटाकळी १२, पातूर १० टेबलवर मतमोजणी होणार आहे. दरम्यान नविासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.