आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात झालेल्या सत्तांतणानंतर दुसऱ्यांदा थेट सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यसाठीच्या निवडणुकीत एकूण 5 हजार 986 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या सरपंचाच्या 266 पदांसाठी एक हजार 326 तर सदस्यच्या 2 हजार 74 जागांसाठी 4 हजार 660 अर्ज प्राप्त झाले आहेत.
आता सरपंचसाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून काेण ‘क्षमतावान’ उमेदवार आहे, याची चाचपणी राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. यंदा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर वर्चस्व असलेली वंचित बहुजन आघाडी सरपंच पदाच्या निवडणुकीत थेट पक्ष म्हणून उतरणार असल्याने रंगत वाढणार आहे.
तालुका निहाय ग्रामपंचायती खालीलप्रमाणे आहेत.
अकोला -54
अकोट - 37
बाळापूर - 26
बार्शीटाकळी - 47
मूर्तिजापूर - 51
पातूर - 28
तेल्हारा - 23
मंगळवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस
उमेदवारी अर्ज 7 डिसेंबर रोजी दुपारी 3.00 पर्यंत मागे घेता येणार आहे. मतमोजणी 20 डिसेंबर राेजी हाेणार आहे.
अशी आहे संख्या
तालुका सरपंच जागा सदस्य जागा
तेल्हारा - 23,191
अकाेट - 37,305
मूर्तिजापूर - 51,391
अकाेला - 51, 404
बाळापूर - 26, 198
बार्शीटाकळी - 47, 359
पातूर - 28, 226
एकूण - 2,66, 2047
उमेदवारी अर्जांची संख्या
तालुका सरपंच पद सदस्य
तेल्हारा - 99,423
अकाेट- 2,18, 908
मूर्तिजापूर- 2,13, 720
अकाेला - 2,46, 887
बाळापूर- 1,39, 420
बार्शीटाकळी -2,54,785
पातूर -1,57 ,517
एकूण - 1,32,64,660
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.