आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘नाफेड’च्या माध्यमातून हमीभावाने हरभरा खरेदी प्रक्रियेला मंगळवारी प्रारंभ हाेणार आहे. खुल्या बाजारापेक्षा प्रती क्विंटल ५०० ते ६०० रुपये जादा दर िमळणार असल्याने शेतकरी आॅनलाइन नाेंदणीसाठी गर्दी करीत आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाकडे आतापर्यंत १४ हजार ७२७ शेतकऱ्यांनी नाेंदणी केली आहे.
महासंघाच्या १० केंद्रावर खरेदीप्रक्रिया हाेणार आहे. जिल्ह्यात हरभरा खरेदी करण्यासाठी नाफेड यंत्रणेकडून खरेदी केंद्र जिल्ह्यात सुरू केलेले नाही. त्यामुळे नाइलाजास्तव शेतकऱ्यांना हरभरा खुल्या बाजारात खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात विकणे भाग पडत आहे.
१ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी
रब्बी हंगामात िजल्ह्यात एकूण १ लाख २१ हजार १७७ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी झाली हाेती. उशिरापर्यंत पाऊस पडणे, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे, आदींमुळे यंदा हरभरा पेरणीचे क्षेत्र वाढल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे यंदा हरभऱ्याचे उत्पादनही िवक्रमी झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.