आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छाननी:ग्रा.पं. : उमेदवारी अर्जांची आज छाननी

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यत्वासाठीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जाची छाननी ५ डिसेंबर राेजी हाेणार आहे. एकूण ५ हजार ९८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सरपंचाच्या २६६ पदांसाठी एक हजार ३२६ तर सदस्यांच्या २ हजार ७४ जागांसाठी ४ हजार ६६० अर्ज प्राप्त झालेले आहेत.

गत दाेन वर्षे काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी काही दिवस निर्बंध हाेते. तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विविध याचिकांमुळे जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका टप्प्या-टप्प्याने घेण्यात आल्या. त्यानंतर आता ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रा.पं.च्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोमवारी उमेदवारी अर्जांची छाननी होईल.

बुधवारपर्यंत अर्ज मागे घेणार
उमेदवारी अर्ज ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत मागे घेता येणार आहे. मतदान १८ डिसेंबर, सकाळी ७.३० ते ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत करता येणार असून, मतमोजणी २० डिसेंबर राेजी हाेणार आहे.

तालुकानिहाय संख्या
राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे. तालुका निहाय ग्रामपंचायती खालीलप्रमाणे आहेत.

बातम्या आणखी आहेत...