आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालाचेची मागणी करणारा ग्रामसेवक व सरपंच पती यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत त्यांना अटक केली. दोघांनी मिळून 1 लाख 27 हजार 500 रूपये लाचेची मागणी बांधकाम पुरवठा करणाऱ्यास केली होती. मात्र, संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
राजेंद्र श्रीराम मेहरे हा बाळापूर तालूक्यातील राहेर अडगाव येथे ग्रामसेवक आहे. तर अशोक सहदेव बोराळे यांची पत्नी सरपंच आहे. तक्रारदार यांनी ग्रामपंचायत राहेर अडगाव अंतर्गत येणाऱ्या किसन उगले ते जगन्नाथ सुडोकार व पिंपळखुटा ते पाझर तलाव या शेतरस्त्याचे कामावर बांधकाम साहित्य पुरवठा केला होता. सदर कामाचे बिलाचे चेक देण्याकरीता ग्रामसेवक राजेंद्र मेहरे याने तक्रारदाराकडे 37 हजार 500 रूपये लाचेची मागणी केली होती व त्याने लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केला. तर अशोक बोराळे याने सदर बिलाचे चेक देण्याकरीता 90 हजार रुपये लाच मागितली. या दोघांनीही 1 लाख 27 हजार 500 रूपयांची लाच मागितली.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र कारवाईची कुणकुण लागल्याने दोन्ही आरोपींनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. या आरोपींनी लाच घेण्याचा प्रयत्न केल्याने आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक यु.व्ही. नामवाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. सरकारी कामासाठी कुणी लाचेची मागणी करीत असेल तर अशांची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी, तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन विभागाने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.