आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:लाचेची मागणी करणारा ग्रामसेवक, सरपंचपती ‘एसीबी’च्या जाळ्यात

पातूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाचेची मागणी करणारा ग्रामसेवक व सरपंच पती याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत त्यांना अटक केली. दोघांनी मिळून १ लाख २७ हजार ५०० रूपये लाचेची मागणी बांधकाम साहित्य पुरवठा करणाऱ्यास केली होती. मात्र, संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

राजेंद्र श्रीराम मेहरे हा बाळापूर तालूक्यातील राहेर अडगाव येथे ग्रामसेवक आहे. तर अशोक सहदेव बोराळे याची पत्नी सरपंच आहे. तक्रारदार यांनी ग्रामपंचायत राहेर अडगाव अंतर्गत येणाऱ्या किसन उगले ते जगन्नाथ सुडोकार व पिंपळखुटा ते पाझर तलाव या शेतरस्त्याच्या कामावर बांधकाम साहित्य पुरवठा केला होता. या कामाच्या बिलाचे चेक देण्याकरीता ग्रामसेवक राजेंद्र मेहरे याने तक्रारदाराकडे ३७ हजार ५०० रूपये लाचेची मागणी केली होती व त्याने लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केला. तर अशोक बोराळे याने या बिलाचे चेक देण्याकरीता ९० हजार रुपये लाच मागितली. या दोघांनीही १ लाख २७ हजार ५०० रूपयांची लाच मागितली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र कारवाईची कुणकुण लागल्याने दोन्ही आरोपींनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. या आरोपींनी लाच घेण्याचा प्रयत्न केल्याने आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक यु.व्ही. नामवाडे, पोलिस निरीक्षक नरेंद्र खैरनार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शुद्धोदन इंगळे, दिगंबर जाधव, प्रदीप गावंडे, सुनील येलोने, कृष्ण पळसपगार, नदीमोद्दीन शेख, नापोशी, शिल्पा वानखडे, इमरान अली, सलीम खान, यांनी कारवाई केली आहे.

सचिवावर निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप : लाचखोर सचिव राजेंद्र मेहरे यांच्यावर शासनाच्या निधीचा दुरुपयोग करून अनियमितता केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परंतु त्यांना वरिष्ठांचे पाठबळ असल्याने त्यांच्यावर कारवाई केली नव्हती, हे विशेष.

बातम्या आणखी आहेत...