आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझारखंड राज्यातील गिरडिह जंगलात असणारे सकल जैन समाजाची काशी म्हणून ओळखला जाणाऱ्या सम्यक शिखरला केंद्र व राज्य सरकारने पर्यटन स्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ महानगरातील सकल जैन समाज भव्य मूकमोर्चा शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात करणार असल्याची माहिती सकल जैन समाजाच्या वतीने मंगळवारी देण्यात आली.
धार्मिक स्थळाचे पावित्र राखले जावे
स्थानीय शांतिनाथ चैतालयात मंगळवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्र व राज्य सरकार जैन धर्मीयांच्या सातत्याने भावना दुखावित असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी सकल जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या. सम्मेद शिखर ही दिगंबर व शेतांबर जैन समाजाची काशी म्हणून संपूर्ण भारतात ओळखल्या जाते. या पवित्र पर्वतावर भारतातील लाखो जैन बांधव मोठ्या संख्येने धार्मिक कार्यासाठी येत असतात. या स्थळाचे पावित्र जपण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
झारखंड राज्य शासनाने ठराव पारित करून हा ठराव केंद्र सरकारला पाठवून हे शिखर पर्यटन स्थळ व इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्याची मागणी केली होती. राज्याच्या महसुलात वाढ व्हावी, विदेशी पर्यटन येथे यावे या हेतूने राज्य शासनाने हा ठराव केला होता. मात्र यामुळे जैन धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील. विदेशी संस्कृती येथे येऊन अश्लीलता व मासाहार करेल व हे पवित्र तीर्थ मलिन होणार आहे. म्हणून जैन समाज संपूर्ण ताकतीनिशी या ठरावाला विरोध करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच गुजरातमधील गीर व पालिथाना जैन तीर्थ संदर्भातही हेच करण्यात येत आहे. यामुळे जैन समाजात असंतोष निर्माण झाला आहे.
असा निघेल मोर्चा
सबब महानगरातील दिगंबर व श्वेतांबर जैन समाज 23 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता शांततेच्या मार्गाने महानगरातून मूक मोर्चा आयोजित करणार आहे. यात जिल्हाधिकारी यांना रीतसर निवेदन देण्यात येणार आहे. जुना शहरातील सेनगण जैन मंदिरापासून हा मोर्चा प्रारंभ होऊन मोठा पूल, सिटी कोतवाली, तिलक रोड,जुना कापड बाजार, गांधी चौक, तहसील कार्यालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात हा निषेधात्मक मोर्चात हजारो महिला, पुरुष सहभागी होणार आहेत. सकल जैन समाजाने या मूक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्रीपाल बिलाला, लक्ष्मीलाला तोरावत, महावीर बिलाला, दीपचंद बिलाला तसेच उपस्थित सर्व बांधवांच्या वतिने करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.