आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनानिमित्तमहानगरातप्रथमच‘सार्वजनिकभीम जयंतीउत्सवसमिती’च्या वतीने विराट मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारतीय बौद्ध महासभा’ व ‘लॉर्ड बुद्धा फाउंडेशन वंदना संघा’च्या अंतर्गत आयोजित ही मिरवणूक शुक्रवार, १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता स्व. वसंत देसाई स्टेडियम मधून निघेल. विविध उत्सव मंडळ, संस्था, संघटना, लेझीम, बँड पथक, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, बुद्ध विहार समिती, नगरातील विविध भीम जयंती उत्सव मंडळांच्या समवेत ही शोभायात्रा निघेल. प्रबोधनवादी व पुरोगामी नागरिक, संस्था, संघटनांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी या मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘सार्वजनिक भीम जयंती उत्सव समिती’चे अध्यक्ष डॉ. अरुण चक्रनारायण, महासचिव सुरेश तायडे, कोषाध्यक्ष प्रकाश सुरडकर, कार्यकारिणी सदस्य देवलाल तायडे, बाळासाहेब अंभोरे, एम. एम. तायडे, इर्भान तायडे, सुनील शिरसाट, यशवंत इंगोले, चंद्रशील दंदी, डि. एस. तायडे, गजानन इंगोले, गौतम तायडे, राजू मोरे, प्रदीप धांडे, नंदरत्न खंडारे, सुनील तायडे, हरिभाऊ आंग्रे, चंद्रमणी इंगळे, संजय इंगळे, उत्तमराव सदांशिव, मिलिंद वानखडे, पंकज वाढवे, सुदर्शन तायडे, मिलिंद घुगे, मधुकर शिरसाट, आनंदा पळसपगार, मुक्ताराम घुगे, जितेंद्र अहिर, संतोष इंगळे, प्रा. संजय खाडे, बाळकृष्ण बोधडे, प्रसेनजीत रोडे, नागोराव शेजव, राजेश समदूर, बाळासाहेब ढोके, राजकन्या सावळे, शोभा वानखडे, मंदा वानखडे, मनवर, कल्पना गवारगुरु, सुमन मनवर, उज्वल गडलींग, उल्का तेलगोटे, चंदा जवंजाळ समवेत सार्वजनिक भीम जयंती उत्सव समिती, भारतीय बौद्ध महासभा, लॉर्ड बुद्धा वंदना संघ आदींनी केले आहे.
असा राहील मिरवणूकीचा मार्ग शोभायात्रा स्व. वसंत देसाई स्टेडियमपासून प्रारंभ होऊन संतोषी माता मंदिर, कॉटन मार्केट, तिलक रोड, सिटी कोतवाली, गांधी रोड, धिंग्रा चौक, बस स्थानक मार्गे अशोक वाटिका परिसरात येऊन या ठिकाणी या विशाल मिरवणुकीचा समारोप करण्यात येणार आहे. यावेळी प्रकाश सुरडकर यांच्यातर्फे या समारोपीय सोहळ्यात १३२ किलोच्या मोतीचूर लाडूचे वितरण करण्यात येणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.