आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंदील:अकोला-अकोट रेल्वेला हिरवा कंदील

अकोला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अकोट डिझेल इंजीनवरील पॅसेंजर रेल्वेला अखेर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. अकोला-अकोट पॅसेंजरच्या वेळा जाहीर झाल्या आहेत. मात्र, तारीख अद्याप निश्चित नाही. त्यामुळे रेल्वे नेमकी कधी मार्गस्थ होईल, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत गाडी सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अकोला-अकोट रस्ता बंद झाल्यामुळे मार्गावर रेल्वे सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. ही मागणी अनेक वर्षापासून आहे. यासाठी रेल्वेरूळाचे कामही सुरू होते. काही दिवसांपूर्वी अकोला-अकोट मार्गावरील गांधीग्रामच्या पुलाला तडा गेला. हा मार्ग प्रवासासाठी बंद करण्यात आला. त्यामुळे अकोला-अकोट प्रवासासाठी लोकांना दर्यापूरमार्गे जावे लागत आहे. त्यासाठी ४० किलोमीटर अधिक प्रवास नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. मुख्य म्हणजे विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि व्यापाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...