आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने अभिवादन बाईक रॅली काढण्यात येणार आहे. रॅली हुतात्मा चौक, नेहरू पार्क चौक ते अशोक वाटिका अशी काढण्यात येणार आहे. यासाठीच्या नियोजनासाठी बैठक वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट हाउस येथे आयाेजित केली हाेती.
या बैठकीत बाईक रॅली बाबत जिल्हा आणि शहर भागात प्रचार करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा आणि महानगरातर्फे गुरुवार १३ एप्रिलपर्यंत शहर व जिल्ह्यामध्ये प्रचार बैठका होतील. युवा आघाडीच्या बैठकीला सचिन शिराळे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख ॲड. प्रशिक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष करण वानखडे, ॲड. सुबोध डोंगरे, जिल्हा सचिव आनंद खंडारे, श्रीकृष्ण देवकुणबी, संतोष गवई, ॲड. मीनल मेंढे, सुजित तेलगोटे, महानगर पूर्व अध्यक्ष जय तायडे, पश्चिम अध्यक्ष आशिष मंगुळकर, संघटक रितेश यादव, बाळापूर तालुकाध्यक्ष संदीप वानखडे, महासचिव सचिन रोहनकर, अकोट तालुका संघटक नंदकिशोर मपारी, आशिष सरपटे, मनोज इंगळे, आशिष सोनोने, आकाश जंजाळ, मंगेश बलखंडे, धीरज इंगळे, किरण शिरसाट, प्रतुल विरघट, अक्षय डोंगरे, शेखर इंगळे, सुधीर वानखडे, महादेव वाघ, अमोल सोनोने, अभिषेक खोंड, देवरथ मानकर, नयन काळे, वैभव खडसे, नागेश उमाळे, ओमकार लांडगे, राहुल शेगोकार, प्रतीन ओवे, वैभव वाघमारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.