आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान:जमिनीचे तापमान 55 अंशांवर; सूक्ष्म जीवाणू, अन्नसाखळी धोक्यात

अकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंशांवर राहत आहे. वाढत्या तापमानाने जमिनीच्या तापमानातही वाढ होत आहे. परिसरातील जमिनीचे पाच सेंटीमीटर खोलीवरील कमाल तापमान ५० ते ५५.५ अंश सेल्सिअस राहत आहे,त्यामुळे जमिनीखालील सूक्ष्म जीवाणूंसह त्यांच्यावर अवलंबून अन्नसाखळी धोक्यात आली आहे. अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिली.

जंगलतोड, शहरीकरण, प्रदूषणाने दरवर्षी तापमानाचे दिवस वाढताहेत. वाढत्या तापमानाने जमिनीचे तापमानही वाढत आहे. मृदविज्ञान अभ्यासकांच्या मते वातावरणाच्या तापमानापेक्षा जमिनीचे तापमान सरासरी ५ ते १० अंशांनी अधिक राहते. दगडाळ, मुरमाड, ओलावा कमी असणाऱ्या जमिनीत जास्त तापमान असते. ग्रामीण कृषी मौसम वेधशाळा परिसरात पाच सेमी खोलीवरील कमाल तापमान शुक्रवारी ५५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. या तापमानवाढीचा परिणाम सूक्ष्म जिवाणूंसह पिकांची वाढ, उत्पादनावर दिसत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. जमिनीत पिकांना पाणी देणे किंवा आच्छादन वापरणे या पिकाखालील जमिनीत बाष्पीभवन रोखण्याचे उपाय असतात. मात्र विस्तारीत स्वरुपात हे उपाय करणे शक्य नसते. त्यामुळे पावसामुळेच जमिनीचे तापमान कमी होते.

५ ते १० ने असते अधिक
तज्ज्ञ सांगतात की जमिनीचे तापमान हे कधीही वातावरणाच्या तापमानापेक्षा ५ ते १० ने अधिक असते. वातावरणाचे तापमान ४५ अंश सेल्सिअस असल्यास जमिनीचे तापमान ५० ते ५५ अंस सेल्सिअस असू शकते.

सूक्ष्म जीवाणू जळून खाक
जमिनीत अवशेषांचे विघटन करणे, सेंद्रीय कर्ब तयार होण्याच्या प्रक्रियेत काम करणे, जमिनीत जैविक व खनिज पदार्थांचा समतोल राखणे आदी विविध कामे सूक्ष्म जीवाणूंच्या माध्यमातून होतात. मात्र उन आणि जमिनीच्या वाढत्या तापमानामुळे सूक्ष्म जिवाणू नाहीसे होत आहेत.

असे घेतले जाते जमिनीचे तापमान
जमिनीचे तापमान घेण्याच्या दोन पद्धती आहेत.
एक पाण्याने भरलेली ट्यूब जमिनीत रोवून त्यामध्ये थर्मामीटर ठेवले जाते.
तापलेल्या जमिनीमुळे पाणी गरम होऊन जमिनीच्या तापमानाची नोंद केली जाते.
दुसऱ्या पद्धतीत भू तापमापी अर्थात सॉईल थर्मामीटर जमिनीत
रोवले जाते.
भू तापमापीद्वारे विशिष्ट खोलीनुसार तापमान घेतले जाते. खोलीनुसार तापमानही बदलते.
दोन्ही पद्धतीत कोरड्या जमिनीचेच तापमान घेतले जाते.

सूक्ष्म जीवांमुळे अन्नसाखळी
सजीवांची अन्नसाखळी ही सूक्ष्म जीवाणूंवर अबलंबून असते. मात्र वाढत्या तापमानामुळे जमिनीचे तापमान वाढत असून, जीवाणूची संख्या कमी होत असून, विघटनाची प्रक्रिया, सेंद्रीय कर्ब तयार होण्याची प्रक्रिया प्रभावित होऊन पिक उत्पादनावरही परिणाम होतो.
डॉ. संजय भोयर, विभाग प्रमुख, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, कृषी विद्यापीठ अकोला.

बातम्या आणखी आहेत...