आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शह-काटशह:आरोपाच्या निषेधार्थ पालकमंत्री कडू यांचे श्रमदान; तर ‘वंचित बहुजन आघाडीचे आत्मक्लेष आंदोलन

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रस्त्यांच्या कामातील अनियमितता प्रकरण, वंचित बहुजन आघाडी विरूद्ध प्रहार जनशक्ती पक्ष

रस्त्यांच्या कामातील अनियमिततेप्रकरणी लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा सोमवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा पालकमंत्री बच्चू यांनी आरोपाच्या निषेधार्थ जुने शहरात डाबकी रोडवर श्रमदान केले. कॅनॉल परिसरातील गोरोबा काका मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर श्रमदान करून कार्यवाहीमुळे झालेल्या वेदनेला वाट मोकळी झाली.

जिल्हा परिषदेच्या सादर केलेल्या कामांच्या प्रस्तावात जिल्हा नियोजन समितीने परस्पर बदल केल्याचा आरोप करीत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी पालकमंत्री कडू यांच्याविरूद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी २ मे रोजी आरोपाच्या निषेधार्थ ‘प्रहार’ने श्रमदान केले. या वेळी पालकमंत्री बच्चू कडू, कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, मनोज पाटील, शविसेनेचे आमदार नितीन देशमुख, उपजिल्हा प्रमुख जि.प. गटनेते गाेपाल दातकर, राहुल कराळे, दिलीप बोचे, दनिेश सरोदे आदींसह मोठ्या संख्येने ‘प्रहार’चे कार्यकर्ते व शविसैनिक उपस्थित होते.

वंचित विकासकामाच्या विरोधात : पाणी पुरवठ्याच्या अनेक प्रस्ताव जि.प.तील सत्ताधारी असलेल्या वंचित बहुजन आघाडीने दिले नसून, वंचित व त्यांचे नेते हे विकास कामांच्या विरोधात असल्याची टीका शविसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी श्रमदानापूर्वी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केली. ‘वंचित’चे नेते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसून, विधानसभेत पराभव करून शविसेनेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. वंचित काहीच करीत नसल्याने आम्ही लोकप्रतनिधींनी नियोजन समितीकडे रस्त्यांची मागणी केली. ही जनहिताची मागणी पालकमंत्री बच्चू कडू यांनी पूर्ण केली, असेही आमदार देशमुख म्हणाले.

आरोपांशी अजिबात संबंध नाही : पालकमंत्री बच्चू कडू
१) रस्त्यांच्या प्रकरणाशी माझा तीळमात्र संबंध नसून, बदनामी करण्यासाठीच हे आहे, अशा अशा शब्दात पालकमंत्री बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला. श्रमदानापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत भावनांना वाट मोकळी करून दिली. कार्यवाहीमुळे वेदना झाल्या असून, माझा न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे, असेही पालकमंत्री कडू यांनी स्पष्ट केले.

२) लोकप्रतनिधींनी कामांची शिफारस केली. शेतकरी, ग्रामस्थांची रस्ता, पुलांअभावी होणारी गैरसोय लक्षात घेता कामांना मंजुरी दिली. कामांबाबत तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी-अभियंत्यांची असते. शासनानेही काम सुरू करण्याचा आदेश दिला. रस्ते अस्तित्वातच असल्याने काम होत आहे. त्यामुळे मी फसवणूक केल्याचे सदि्धच होत नसल्याचा दावाही पालकमंत्री कडू यांनी केला.

श्रमदानस्थळी लावले फ्लेक्स : गायगाव ते रिधोरा, जुने धनेगाव ते नवे धनेगाव हा रस्ता, इतर जिल्हा मार्ग ११ ला जोणाऱ्या धामणा व कुटासा ते पिंपळोद रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे, या कामांचा उल्लेख ‘वंचित’ने मूळ तक्रारीत केला होता. श्रमदान स्थळी प्रहारने या ठिकाणांचे काम सुरू होण्यापूर्वीचे फोटो आिण आता कार सुरू असतानाचे फोटो फ्लेक्सवर लावले होते. त्यातून त्यांनी भ्रष्टाचार झाला नसून, कामे जनहितासाठीच आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

दवि्यांगांकडून भर उन्हात स्वागत
श्रमदानाच्या ठिकाणी पालकमंत्री बच्चू कडू यांचे स्वागत करण्यासाठी दवि्यांग बांधव भर उन्हात थांबून होते. मुख्य रस्त्यापर्यंत ते पायी गेले. पालकमंत्री कडूंचे दुचाकीवर आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून स्वागत केले. श्रमदानासाठी कार्यकर्त्यांनी घमेले, फावडे, वाहने, बांधकाम साहित्याचीही (मुरुम) व्यवस्था केली होती.

बातम्या आणखी आहेत...