आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईचा आदेश:महिला बचतगटांच्या फसवणूकप्रकरणी  पालकमंत्र्यांनी दिला कारवाईचा आदेश; स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याच्या नावाखाली उकळले पैसे

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॅन्सी बटन बनवण्यासाठी मशीन आणि कच्चा माल देऊन स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली फसवणूक झालेल्या महिलांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत पालकमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. महिलांनी फसवणूक कशी झाली, याचा पाढाच वाचला. यावर पालकमंत्री कडू यांनी कारवाई करण्याची ग्वाही दिली.

चार महिन्यांपूर्वी रिंग रोडवर संगीता चव्हाण यांनी पुणे येथील राधाकृष्ण सेल्ये या कंपनीचे कार्यालय सुरू केले. महिला बचतगटांना बटन तयार करण्यासाठी कच्चा माल, मशीन उपलब्ध करून देण्याचे होश्वासन कंपनीकडून देण्यात होले. बटन तयार केल्यानंतर प्रती बटन २ रुपये प्रमाणे खरेदी करण्यात येईल, असेही महिलांना सांगण्यात होले. यासाठी अनेक महिलांकडून प्रत्येकी ११ हजार रुपये घेण्यात होले. काही महिलांना मशीन व कच्चा मालही देण्यात होला. काही महिलांना मसाला तयार करण्यासाठी साहित्य पुरवण्यात होले. मात्र महिलांकडून हा माल घेण्यात होला नाही. तसेच घेतलेले पैसेही परत मिळाले नाहीत. होमची फसवणूक झाली होहे, अशी होपबिती महिलांनी तक्रारीत मांडली.

दरम्यान सोमवारी महिलांनी पालकमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे व्यथा मांडली. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष यश होमप्रकाश सॉवल, माजी आमदार हरिदास भदे , माजी अध्यक्ष अनिल मालगे, अजय मते यांच्यासह राकॉचे अन्य पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महिलांनी सॉवल यांच्याकडेही तक्रार दिली होती.

पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न : महिलांशी पालकमंत्री बच्चू कडू यांनी संवाद साधला. सत्तेत कोणीही असू द्या; तुमचे पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न करू. प्रसंगी गुन्हे दाखल करू. संबंधितांची संपत्ती जप्त करणे, सील लावणे यासारखी कारवाईदेखील करण्यात येईल, असेही पालकमंत्री कडू म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...