आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:जिल्हा विधिसेवा प्राधिकरणातर्फे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर

अकाेला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्ह्यातील इयत्ता ८ वी ते १२ वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियम, रॅगिंग, व्यसनाचे दुष्परिणाम अादींबाबत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.के. केवले यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, डाबकी रोड, जसनागरा स्कूल रिधोरा, कोठारी कॉन्व्हेंट विद्यानगर, महाराष्ट्र विद्यालय, जठारपेठ, भारत विद्यालय, तापडीया नगर, डी.आर. विद्यालय, सहकार नगर, प्राजक्ता विद्यालय, कौलखेड, मोहरी देवी कन्या विद्यालय, डाबकी रोड या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यो. सु. पैठणकर, दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. ओ. पांडे, विभा धुर्वे, अॅड. जी.के. खाडे, सुमेध डोंगरदिवे, दिप्ती वोराणी, पाेिलस हवालदार गोपाल मुकुंदे, पूजा दांडगे, दीपाली नारनवरे,आश्विनी माने यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक डी.पी. बाळे, संजय रामटेके, राजेश देशमुख, कुणाल पांडे, हरिष इंगळे, शाहबाज खान आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...