आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. पंजाबराव देशमुख कृषी वदि्यापीठ अंतर्गत कृषी महावदि्यालय शिर्ला (अंधारे) येथील वदि्यार्थी हेमंत ज्ञानेश्वर जकाते, नेहा वनिीत खंडारे यांनी चांदूर येथील शेतकऱ्यांना माती परिक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. जमनिीची सुपीकता जपण्यासाठी सातत्याने माती परीक्षण करावे, याबाबत माहिती दिली.पिकाच्या वाढीसाठी आवश्यक घटकांची पूर्तता जमनिीतून होत असते. त्यासाठी योग्य खत नियोजन करताना माती परीक्षण अहवालाचा लाभ होतो. माती परीक्षणातून उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्मअन्नद्रव्ये, सेंद्रिय कर्ब, जमनिीचा सामू, वदि्राव्य क्षारांचे प्रणाम आदीची माहिती मिळते याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. पीक काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी तीनमहनि्यांनी मातीचा नमुना पाठवावा. जमनिीची एकरूपता, रंग, सुपीकता, खडकाळपणा, उंच सखलपणा लक्षात घेऊन वेगवेगळे भाग पाडून ५ ते १८ नमुना गोळा करावे. आदी विविध बाबींची माहिती यावेळी देण्यात आली. प्राचार्य डॉ. आर. पी. खरडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. टी. कव्हर, कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. ए. देशमुख व विषयतज्ञ प्रा. एच. एस. पोरे, प्रा. आर. एस. कनोजे, प्रा. बी. एस. राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी आशिष निखाडे, संतोष बंड, नारायण चोपडे, अमरदीप बंड आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.कृषी च्या वदि्यार्थ्यांकडून माती परीक्षण शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.