आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 हजार 476 लाभार्थ्यांचा मार्ग मोकळा:आवास योजनेतील गुंठेवारी लाभ धारकाचे प्लॉट होणार नियमानुकुल

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान आवास योजनेतील गुंठेवारी लाभ धारकांचे प्लॉट नियमानुकुल करण्यास महापालिकेने प्रारंभ केला आहे. त्यामुळे 2 हजार 476 लाभार्थ्यांच्या घरकुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापालिकेच्या मुळ तसेच हद्दवाढ भागात मोठ्या प्रमाणात गुंठेवारी पद्धतीचे प्लॉट आहे. महापालिकेने गुंठेवारीचे नियमानुकुल करणे 2014 पासून बंद केले होते. यामुळे केवळ आवास योजनेतील लाभार्थीच नव्हे तर अन्य गुंठेवारी प्लॉट धारकही त्रस्त झाले होते. तसेच गुंठेवारी प्लॉट धारकांनी आवास योजनेत घरकुलासाठी अर्ज दिले होते.

महापालिका क्षेत्रात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत दोन टप्प्यात गुंठेवारी पद्धतीच्या 2 हजार 476 लाभार्थ्यांचे प्रकरणे मंजुर करण्यात आली होती. मात्र गुंठेवारीचे नियमानुकल करण्यात अडचणी येत होत्या. राज्य शासनाने याबाबत धोरण निश्चित केले तरीही महापालिकेतील लाभार्थ्याचा प्रश्न रेंगाळला होता. मात्र आता गुंठेवारीचे नियमानुकुल करण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.

मागील पाच ते सहा वर्षापासून हे लाभार्थी आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहात होते. मात्र आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान राज्य शासनाने गुंठेवारी विकास अधिनियमात सुधारणा केल्या आहेत. गुंठेवारीचे नियमानुकुल करताना संबंधित भागातील रेडीरेक्नर नुसार विकास शुल्काचे दर निश्चित केले जातील. तसेच विकास शुल्काच्या तीनपट प्रशमन शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे आवास योजनेतील लाभार्थ्यांना गुंठेवारीचे नियमानुकुल करताना अधिक खर्च करावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...