आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभायात्रा:गुरुदेवनगरात संत‎ गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव‎

तिवसा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुकुंज मोझरी येथील गुरुदेवनगर स्थित गणेश‎ विहार कॉलनीत सोमवार, ६ फेब्रुवारीपासून संत‎ गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवास प्रारंभ‎ होणार असून, १३ फेब्रुवारीला पालखी,‎ शोभायात्रा, काला व महाप्रसादाने महोत्सवाचा‎ समारोप होणार आहे.‎ ६ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान या‎ महोत्सवात संगीतमय श्रीराम कथा व ज्ञानयज्ञ‎ होणार आहे. या सप्ताहादरम्यान दररोज सकाळी‎ ९ ते १२ पर्यंत गजानन विजय ग्रंथ पारायण हाेणार‎ आहे. ६ फेब्रुवारीला पहाटे ४.३० वाजता‎ तीर्थस्थापना व मंगलकलश पूजनाने अर्चना‎ खारोडे व पुंडलिक खारोडे यांच्या हस्ते प्रारंभ‎ होईल. सप्ताहात दररोज सकाळी ५.३० ते ६.३०‎ पर्यंत सामुदायिक ध्यान, काकडा आरती व‎ सायंकाळी ६ ते ७ वाजता सामुदायिक प्रार्थना व‎ हरिपाठ होईल.

दररोज सायंकाळी ७.३० ते रात्री‎ ८.३० या वेळेत भजनाचा कार्यक्रम होईल. १२‎ फेब्रुवारीला रक्तदान शिबिर आयोजित केले‎ आहे. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते १० वाजता‎ संत गजानन महाराज पालखी, शोभायात्रा व‎ ग्रंथदिंडी गुरुदेवनगर गावातून निघेल. सकाळी ११‎ वाजता श्रीहरी महाराज सोनेकर यांचे काल्याचे‎ कीर्तन होईल. दुपारी २ ते ५ पर्यंत महाप्रसादाचा‎ कार्यक्रम राहील. या प्रगट दिन महोत्सवानिमित्त‎ आयोजित श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचा सर्व‎ भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संत गजानन‎ महाराज बहु.संस्था व भक्तगणांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...