आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीविरुद्ध गुन्हा:जुने शहरात घरातून केला गुटखा जप्त

अकाेला3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने शहर पोलिसांनी हमजा प्लॉट येथील एकाच्या घरात छापा टाकला असता, त्याच्या घरातून पोलिसांनी गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात गस्तीवर असलेल्या पोलिसांना माहिती मिळाली की, हमजा प्लॉट येथे सयद वाजीद सयद जाफर याने त्याच्या घरी गुटखाची साठवणूक केलेली आहे. त्यानुसार पोलिसांनी सयद वाजीद सयद जाफर याचे राहते घरी छापा टाकला असता त्याच्या घरात पोलिसांना ७ हजार ९८२ रुपयांचा गुटखा दिसून आला. त्यानंतर गुटखा जप्त करून पोलिसांनी आरोपी विरुद्ध जुने शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे व पोहेकाँ. पप्पू ठाकूर, अविकांत सुरवाडे, महिला पोलिस शैला खंडारे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...