आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखा:गुटखा विक्री करणारी टोळी जिल्ह्यातून हद्दपार; 55 महाराष्ट्र पोलिस अधीनियमान्वये अकोला जिल्हा

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुटखा विक्री करणाऱ्या गुन्हेगारी टोळीला आळा बसावा, याकरीता पोलिस अधीक्षकांनी शहराच्या हद्दीतील गुटखा विक्री करणारे बैदपुऱ्यातील वहीद खान जहागीर खान वय ५५ व आदील खान फिरोज खान वय ३० या दोघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले. ही कारवाई शनिवारी केली.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होते. या गुटखा विक्रीमध्ये सक्रीय असलेल्या आरोपींचे रेकॉर्ड बघता जुने शहर पोलिसांनी वहीद खान जहागीर खान व आदील खान फिरोज खान या दोघांना गुन्हेगारी टोळी म्हणून कलम ५५ महाराष्ट्र पोलिस अधीनियमान्वये अकोला जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे पाठवला.

पोलिस अधीक्षकांनी या दोघांविरुद्ध आदेश पारीत करून त्यांना दोन वर्षांकरीता हद्दपार केले आहे. अनेकदा आरोपीविरुद्ध पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. महिनाभरापूर्वी जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या पथकाने छापा टाकला होता. त्यातही या आरोपीचे नाव होते. त्यानंतर पोलिस त्याचा शोध घेत होते.

अकोला जिल्ह्यात गुटख्याची तस्करी करणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या हेतूने पोलिसांनी आरोपींविरूद्ध आदेश पारीत केला. गुटख्या तस्करीला आळा बसावा, यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, विशेष पथकाचे प्रमुख तथा जुने शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विलास पाटील यांनी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई केली. या कारवाईमुळे गुटखा माफीयांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.

बातम्या आणखी आहेत...