आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाॅर्ड:स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्राला मिळेल मेडिसिनचा वाॅर्ड

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या रुग्णांसाठी मेडिकल वाॅर्ड उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरू आहे. मेडिकल वाॅर्ड नवीन इमारतीत स्थलांतरीत केल्यानंतर रिकाम्या वाॅर्डापैकी एक वाॅर्ड स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाला मिळणार आहे, अशी माहिती जीएमसीच्या वैद्यकीय सूत्रांकडून कळाली आहे.

सर्वोपचार रुग्णालयात वाढणारी रुग्णसंख्या पाहता स्त्रीरोग, प्रसुतीशास्त्र विभागाच्या वाॅर्डात रुग्णांसाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे महिला रुग्णांना त्रास हाेत आहे. येथील ३० खाटांच्या वाॅर्डात ७० रुग्णांवर उपचाराची वेळ रुग्णालयावर आली. एका खाटेवर दोन तर कधी फरशीवर गादी टाकून प्रसूती झालेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. मेडिसीनचे वाॅर्ड पाच, सहा, सात, अतिदक्षता विभाग वाॅर्ड आठ, वाॅर्ड नऊ येथेही रुग्णसंख्या क्षमतेपेक्षा अधिक राहते. बहुतांश वाॅर्ड ४० खाटांचे आहेत. कधी दुप्पट रुग्ण येतात. यावर तोडगा काढण्यासाठी मेडिसीन विभाग नवीन इमारतीत स्थलांतरीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला महिना लागू शकतो. मेडिसीन वाॅर्ड नवीन इमारतीत स्थलांतरीत झाल्यावर एक वाॅर्ड स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागासाठी तर एक वाॅर्ड बालरोग विभागासाठी मिळू शकतो. असेही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...