आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात दिड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन:गणेश घाटावर व्यवस्था, सर्वत्र 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लाडक्या गणरायाची स्थापना बुधवारी झाली. तर 1 सप्टेंबर रोजी ज्या नागरिकांकडे केवळ दिड दिवसासाठी लाडके गणराया स्थानापन्न होतात. त्या गणेश भक्तांनी दुपार नंतर दिड दिवसाच्या गणपतीचे ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या च्या जयघोषात विसर्जन केले.

गणेश उत्सव म्हणजे, चैतन्य, आनंद, उत्साहाची उधळण. गणपतीच्या आगमनाची तयारी केवळ सार्वजनिक गणेश मंडळेच करतात असे नाही. तर घरोघरी गणपतीच्या आगमनाची तयारी केली जाते. चिमुकले या कामात दंग होतात. घरातल्या घरात देखावे, सजावटही केली जाते.

शेकडो नागरिकांच्या घरी दिड दिवस बाप्पा

बहुतेक नागरिकांच्या घरी गणेश बाप्पा दहा दिवसासाठी विराजमान होताच. मात्र काही नागरिकांकडे दिड दिवस, तीन दिवस तसेच पाच दिवसांच्या मुक्कामाला बाप्पा येतात. कोकणात जवळपास दिड, तीन आणि पाच दिवसाच्याच गणपतीची घरोघरी स्थापना होते. तुलनेने विदर्भात कमी होते. मात्र शेकडो नागरिकांच्या घरी दिड दिवसाच्या गणपतीची स्थापना केली जाते. त्यामुळे 1 सप्टेंबर रोजी दुपार नंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.

कृत्रिम टाक्यांची व्यवस्था

महापालिका प्रशासनाने शहर कोतवाली येथील मुख्य गणेश घाटावर आठ टाक्यापैकी दोन कृत्रिम टाक्या दिड दिवसाच्या गणपत्ती बाप्पाच्या विसर्जनासाठी तयार केले आहेत. त्याच बरोबर गणेश घाटावर निर्माल्यासाठीही व्यवस्था केली आहे. गणेश भक्तांनी निर्माल्य नदीत न टाकता. निर्माल्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणीच निर्माल्य टाकावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नदी पात्रात गणेश विसर्जन

या कृत्रिम टाक्यात विसर्जित केलेले गणपतीचे महापालिकेच्या ट्रॅक्टर मधुन कापशी तलावात विसर्जन करण्यात आले. प्रशासनाने एका ठिकाणी व्यवस्था केली असली तरी शहरातून मोर्णा नदी वाहते. त्यामुळे नदीकाठावरील वस्त्यांमध्ये ज्या नागरिकांकडे दिड दिवसाचा गणपती आहे. त्यांनी थेट नदी पात्रात गणेश विसर्जन केले.

घरीच विसर्जित केले

तर काही मंडळांच्या वतीने दिड दिवसाच्या बाप्पाला आपल्या घरीच निरोप देण्यासाठी कुंडीचे वितरण करण्यात आले आहे. अनेक नागरिकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरीच विसर्जित केले. यामुळे नदी प्रदुषणही कमी झाले. ज्या नागरिकांकडे तीन दिवसाचा गणपती आहे, त्या गणरायाचे विसर्जन शुक्रवार दोन सप्टेंबर रोजी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...