आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखीपौणिमा:हस्तकलेच्या राख्यांना पसंती कायम; ब्रेसलेटचीही क्रेझ; महिलांसह मुलींची खरेदीसाठी लगबग

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिना लागताचा उत्सवांना सुरुवात होते. यात बहीण भावाचे नाते वृद्धिंगत करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा. पुढील महिन्यात ११ ऑगस्टला राखीपौणिमा आहे. मात्र, अकोल्यात आतापासून रस्त्यावरच राख्यांची दुकाने सजली आहेत. सणानिमित्ताने डायमंड, स्टोन, मोती राखी यासह विविध प्रकारच्या रंगीबेरंगी राख्या रस्त्यावरील दुकांमध्ये विक्रीसाठी आल्या आहेत.

राखीपौर्णिमेनिमित्त जनता बाजार, गांधी चौक, दुर्गा चौक, गौरक्षण रोड, जठारपेठ यासह शहरातील विविध भागात आकर्षक अशा राख्यांनी दुकाने सजायला सुरुवात झाली आहे. यंदाही हस्तकलेच्या राख्यांना पसंती कायम असून, ब्रेसलेट राखीची क्रेझ दिसून येत आहे. याशिवाय रुद्राक्ष, डायमंड, मोती, ओंकार राखी बाजारात दाखल झाल्या आहेत. याशिवाय चांदीसह ऑक्सिडाइज्ड तसेच तांब्याच्या राख्याही बाजारात उपलब्ध असल्याचे राखी विक्रेते रमेश तायडे यांनी सांगितले.

भावासोबतच वहिणीला बांधणाऱ्या राख्यांमध्येही या वेळी वेगळा ट्रेंड आहे. या राख्यांमध्ये वेगवेगळी विविधता पाहायला मिळत आहे. घुंगरू, लाख, राजस्थानी मिरर वर्क आणि काचेची सजावट असलेल्या राख्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये कलर्ड स्टोन, कुंदन वर्क, कलर्ड बीड्सचाही वापर करण्यात आला आहे. सध्या बाहेरगावी भाऊ असलेल्या बहिणींकडून भावाला पोस्टाने राखी पाठवण्यासाठी खरेदी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...