आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोट बाजारपेठेत कापसाला 9 हजार111 भाव:शेतकऱ्यांमध्ये आनंद, कापूस खरेदीला प्रारंभ

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्यातील आकोट कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये खाजगी कापूस खरेदीचा शुभारंभ 31 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. मंगळवारीअकोट बाजारपेठेत कापसाला 9111 भाव मिळाला. कापसाला चांगला भाव मिळाल्याने खऱ्या अर्थाने हा शुभमुहूर्त ठरला आहे.

असा झाला शुभारंभ

यावेळी प्रथम कापूस आणणा-या शेतक-यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. मुहूर्तावर कापूस आणणारे शेतकरी मनिष मोहन तायडे रा. पोपटखेड यांचा बाजार समितीचे मुख्य प्रशासक गजानन गोपाळराव पुंडकर व तालुक्यातील प्रतिष्ठित शेतकरी मुरलिधर हरिचंद्र चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

7600 पासून 9111 पर्यंत मिळाला भाव

मुहूर्तावर नंदिकेश्वर जिनिंगकडून सुनिल काळे यांनी लिलावात बोली लावुन मुर्हुताच्या कापसाला 9111 रुपये भाव दिला. तसेच अभय प्रमोद तळोकार रा. आकोट, अरुण देवमन सपकाळ रा. खैरखेड, उषा प्ररमानंद लोखंडे रा. आकोलखेड प्रमोद रामचंद्र खंडारे या कास्तकांरानीही कापूस शेतमाल विक्री करीता आणला यांचा बाजार समितीचे प्रशासक, निखील विजय गावंडे, रितेश महाविरप्रसाद अग्रवाल, विशाल प्रभाकर बोरे, कुलदिप भिमराव वसु, बाजार समितीचे सचिव सुधाकर किसन दाळू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी यांच्या कापसाला लिलावात 7600 पासून 9111 पर्यंत भाव मिळाला.

यावेळी बाजार समितीचे माजी संचालक अतुल म्हैसने, कापूस व्यापारी, पवन गुप्ता, प्रवीण चांडक, दिपक अग्रवाल, प्रशांत अग्रवाल, राजू केला, किशोर लखोटीया, मुरलिधर चौधरी, विजय अग्रवाल, नविन चांडक, धिरज चांडक, निलेश पालीवाल, रोमिल अग्रवाल, विनोद वरणकार, विजय नानोटे, प्रफुल पिंपळे व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...