आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेचा छळ:उच्चशिक्षित विवाहितेचा छळ; पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वयंपाक येत नाही, असे म्हणून आणि माहेरहून पैसे घेऊन ये, या कारणासाठी उच्चशिक्षित विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपाखाली पतीसह नागपूर येथील नवीन सुभेदार सह. पतसंस्थेचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेेते मोहन ठाकरे व अन्य सहा जणांविरूद्ध खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कपिला नगर गोरक्षण रोड येथील बी टेक शिक्षण झालेल्या व नोकरीला असलेल्या युवतीचा विवाह नागपूर येथील खडगाव रोड लावा येथील मयुर मोहन ठाकरे याच्याशी १३ जुलै २०२१ रोजी झाला होता. लग्नामध्ये पती व सासु-सासरे यांच्या मागणीनुसार साडेसात लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम दिली होती. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आतेसासु सुरेखा काशीनाथ इंगळे हिने घरातील सर्व लोकांसमोर तू नाकाची नथ आणली नाही तुझ्या बापाने तुला विकले असे म्हणून विवाहितेचा अपमान केला होता.

विवाहितेच्या पतीला दारूचे व्यसन होते. त्यामुळे रोज दारू पिऊन घरी यायचा आणि या त्याच्या कारचे हप्ते भरण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावायचा. त्यानुसार विवाहितेच्या वडिलांनी त्याला ८९ हजार रूपये ऑनलाइन पाठवले होते. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्याने ते आणखी पैशाची मागणी करीत होते. आणखी पैसे घेऊन ये, त्यासाठी नकार दिल्यानंतर शिवीगाळ करून मारहाण करायचे. आत्यासासुचा मुलगा गणेश, मामेसासरे रामदास थोटे रा. नागपूर आणि त्यांचे फॅमिली डॉक्टर ह्दयनाथ मार्कड रा. हिंगणा रोड नागपूर हे सुद्धा घरी येऊन पती, सासू सासरे यांना भडकावत होते. तू चांगली नाहीस, तुला पतीला खूश ठेवता येत नाही, असे म्हणून टोमणे मारायचे, असे आरोप विवाहितेने तक्रारीत केले आहे.

तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती मयुर मोहन ठाकरे, सासरे मोहन दशरथ ठाकरे, सासू सुनिता मोहन ठाकरे, दीर मकरंद मोहन ठाकरे, रेखा उर्फ सुरेखा काशीनाथ इंगळे, गणेश काशीनाथ इंगळे, डॉ. ह्दयनाथ मार्कड, रामदास थोटे यांच्याविरूद्ध भादंविचे कलम ४९८ अ, ३२३, ५०४,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...