आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:उपजिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांना‎ त्रास; वंचित युवा आघाडीचे हात जोडो आंदोलन‎

अकोला‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध सरकारी प्रकल्पात जमीन‎ आणि घरे गेलेले प्रकल्पग्रस्तांसाठी‎ उपजिल्हाधिकारी कार्यालय छळ‎ छावणी बनले आहे,’ असा आराेप‎ करीत वंचित बहुजन आघाडीने‎ मंगळवारी हात जाेडाे, असे अभिनव‎ आंदाेलन केले. उपजिल्हाधिकाऱ्यांना‎ फ्लेक्सवर छापील निवेदन देऊन‎ प्रकल्पग्रस्ताना त्रास देऊ नका, अशी‎ िवनंती करण्यात आली.‎ िजल्ह्यात अनेक िसंचन प्रकल्प,‎ रस्ते आणि इतर शासकीय‎ उपक्रमांसाठी सरकारने नागरिकांच्या‎ जमीन व घरे संपादित करून प्रकल्प‎ उभे केले आहेत. सदर प्रकल्पग्रस्त‎ शेतकरी आणि नागरिकांना‎ प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे देण्याची‎ जबाबदारी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अधिकाऱ्यांकडे आहे. मात्र त्यांचे‎ कार्यालय प्रकल्पग्रस्तांसाठी छळ‎ छावणी बनली आहे, असा आराेप‎ वंचित बहुजन युवा आघाडीने केला.‎

उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार‎ यांना निवेदन सादर करण्यात आले.‎ यावेळी प्रदेश महासचिव राजेंद्र‎ पातोडे, सचिन शिराळे, विकास‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संदांशिव, राजकुमार दामोदर, ॲड.‎ प्रशिक मोरे, संतोष गवई, नीलेश‎ इंगळे, नितीन वानखडे, सुबोध डोंगरे,‎ संतोष वनवे, आनंद खंडारे , श्रीकृष्ण‎ देवकुनबी, रितेश यादव, वैभव‎ वाघमारे,अक्षय वाघ, साहिल‎ गोपनारायण,निशांत बागडे आदी‎ कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.‎ तारीख पे तारीखः १ ) पाच वर्षांपेक्षा‎ जास्त काळापासून अनेक प्रकल्पग्रस्त‎ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे‎ उंबरठे झिजवत आहेत. कार्यालयात‎ यादीत नसलेले कागदपत्रे सादर‎ करण्याची सक्ती केली जाते.‎ सुनावणीसाठी तारीख दिल्यानंतरही‎ अधिकारी गैरहजर असतात, असे‎ वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे‎ आहे.‎ २) उपजिल्हाधिकारी कार्यालयातील‎ संबंधित कामकाज पाहणारा लिपिक‎ प्रकल्पग्रस्तांना अत्यंत उर्मट वागणूक‎ देताे, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे‎ प्रकल्पग्रस्तांची छळ छावणी बंद करा,‎ अशी िवनंती करण्यात आली. मात्र‎ कामकाजात सुधारणा न झाल्यास‎ युवा आघाडी आपल्या स्टाइलने‎ दुरुस्ती करून घेईल, असा इशारा‎ आंदाेलकांनी दिला.‎

बातम्या आणखी आहेत...