आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल प्राप्त:हार्डशीप अॅन्ड कंपाउंडींग योजना; 48 प्रस्ताव दाखल

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका प्रशासनाने उत्पन्न वाढवण्याच्या हेतूने तसेच मंजुर नकाशापेक्षा अधिक केलेले बांधकाम काही प्रमाणात नागरिकांना वैध करता यावे, यासाठी सुरू केलेल्या हार्डशीप अँड कंपाउंडिंग योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ४८ पेक्षा अधिक प्रस्ताव नगररचना रचना विभागात दाखल झाले आहेत. यापैकी २५ प्रकरणांना मंजुरी मिळाली असून, यातून महापालिकेला तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला आहे. ज्या नागरिकांनी मंजुर नकाशापेक्षा अधिक बांधकाम केले असेल त्यांनी या योजनेत प्रस्ताव दाखल करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

बांधकाम नियंत्रण नियमावली नुसार अवैध बांधकाम वैध करण्याबाबतचे काही प्रमाणात अधिकार आयुक्तांना देण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी हार्डशीप अॅन्ड कंपाउंडिंग योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.

या योजनेत प्रस्ताव दाखल केल्यानंतर दंडाची रक्कम भरुन बांधकाम वैध करुन घेता येणार आहे. महापालिकेच्या नगररचना विभागात ४८ पेक्षा अधिक प्रस्ताव दाखल झाले आहेत. यापैकी २५ पेक्षा अधिक प्रस्ताव मंजूर करण्यात आले. जे प्रस्ताव मंजुर करण्यात आले. त्यांच्यापैकी काहींनी दंडाच्या रकमेचा भरणा केल्याने महापालिकेला तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे.

फ्रंट मार्जीन सोडावीच लागेल
आयुक्तांना हार्डशीप व कंपाउंडिंगमध्ये काही अधिकार देण्यात आले आहेत. मात्र नगररचना अधिनियमानुसार समोरच्या बाजूने (फ्रंट साइड) जेवढे अंतर सोडावे लागते. तेवढे अंतर सोडावेच लागणार आहे. या अंतरात बांधकाम झाले असल्यास ते वैध होणार नाही.

त्याच बरोबर पार्किगच्या जागेचा उपयोग गाळा म्हणून अथवा निवासासाठी केला असेल तर दंडाची रक्कम भरुनही वैध होणार नाही. अशा बांधकामावर कारवाई केली जाणार आहे. मात्र समास अंतर आणि अधिकचा एफएसआय वापरला असल्यास दंडाची रक्कम भरुन हे बांधकाम वैध करता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...