आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसटी महामंडळाच्या ताब्यात असणाऱ्या भंगार बसेसमुळे अनेकदा बसमधील प्रवाशांना फटका बसतो. याशिवाय बसमधून निघणार्या धुराच्या लोटामुळे रस्त्यावरील इतर वाहन चालकांची डोकेदुखी वाढत आहे. वाहनचालकांची किरकोळ चूक असली तरी वाहतूक पोलिस करवाईला बडगा उचलतात. मात्र, कारखान्याच्या चिमणीप्रमाणे महामार्गांवर सारखा धूर ओकत चालणार्या राज्यातील भंगार बसेसवर कारवाई का नाही? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाट पाहीन पण एसटीनेच जाईल असा प्रवाशांचा विश्वास एसटीने जपला आहे. मात्र दुसरीकडे भंगार बसमुळे विद्यार्थी प्रवाशांना अनेकदा नाहक त्रास सहन करावा लागतो. ग्रामीण भागात सोडण्यात येणाऱ्या बहुतांश बसेस या भंगार असल्यामुळे विद्यार्थी शेतकऱ्यांना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. वाटेतच बस बंद पंडणे, पंचर होणे किंवा इतर तांत्रिक बिघाडांमुळे वाटतच बसेस बंद पडून प्रवाशांना दुसऱ्या बस द्वारे पुढील प्रवास करावा लागतो.
भंगार आणि नादुरुस्त झालेल्या बसेस बदलाव्या या संदर्भात वारंवार मागणी होत असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. अनेक एसटी बसेस मोठ्या प्रमाणात धूर सोडत असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. महानगरांमध्येही अशा बस धावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याकडे एसटी महामंडळाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.
दुचाकीस्वारांना त्रास
नंदुरबार डेपोची धुळे नाशिक महामार्गावर धावणारी बस मंगळवारी रस्त्यावर धूर ओकत धावत होती. नाशिक शहरापर्यंत उभ्या रस्त्यावर सलग या बसमधून कारखान्याच्या धुरांड्यातून बाहेर यावा तसा धूर बाहेर येत होता. त्यामुळे दुचाकीस्वरांना चालणे ही कठीण जात होते. अशा बसेस वायू प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.