आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:खा. विनायक राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिंदेसेनेकडून दहन

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाने मंगळवारी रात्री रेल्वेस्थानकावर गद्दारच्या घोषणा दिल्या होत्या. या घटनेचा शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी बसस्थानकासमोर खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध केला. चिखली येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेसाठी आढावा घेण्याकरीता खासदार विनायक राऊत आले होते. परत जाताना ते उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांसह अकोला रेल्वेस्थानकावर विदर्भ एक्सप्रेसच्या प्रतीक्षेत होते.

अचानक त्याच एक्सप्रेसने जाण्यासाठी वाशीमच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी रेल्वेस्थानकावर दाखल झाल्या. तेथे खासदार विनायक राऊत यांना सोडण्यासाठी आलेले आमदार नितीन देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा होता. खासदार गवळी यांना पाहून शिंदे गटाने जोरदार घोषणाबाजी करीत खा. गवळी यांना गद्दार… गद्दार…ईडी..ईडी असे म्हणून चिडवले. खा. गवळी रेल्वेत बसल्यावरही नारेबाजी सुरुच होती.

या घटनेचा निषेध करण्यासाठी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांच्या मार्गदर्शनात बुधवारी दुपारी बसस्थानकासमोर शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खा. विनायक राऊत यांच्याविरूद्ध नारेबाजी केली व त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या वेळी योगेश अग्रवाल, युवा सेना जिल्हाप्रमुख निखिल ठाकूर, शहर प्रमुख मुरलीधर सटाले, युवा सेना शहरप्रमुख विक्की सिंग बावरी, राजेश्वरी अम्मा शर्मा, उपशहर प्रमुख गणेश गोगे व शिंदे सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...