आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागैरहजर राहणाऱ्या शिक्षकांचे वेतन अदा केल्यास तुमच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी(प ्राथमिक) सर्व खासगी अनुदानित, अशंत: अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवलेल्या पत्रात दिला आहे. त्यामुळे केवळ कागदाेपत्री हजर राहून वेतन लाटणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.काही अनुदानित, अशंत: अनुदानित शाळांमध्ये कार्यरत कर्मचारी-शिक्षक केवळ कागदाेपत्रीच शाळेत असतात. ते अन्य वैयक्तिक कामात किंवा राजकीय क्षेत्रात सक्रीय असतात. काही जण तर इतरांच्या नावे स्वत:च व्यवसायही करतात.
वेतन शाळेतील कामे करण्यासाठी घ्यायचे आणि हा वेळ व श्रम मात्र वैयक्तिक –राजकीय क्षेत्रासाठी खर्च करायचा असा त्यांचा नित्यक्रम असताे. शाळेत प्रत्यक्षात हजर राहून तेथील कामे न करणारे हे कर्मचारी-शिक्षक विद्यार्थ्यांचे नुकसान करीत असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. यासर्वांचे शिक्षण संस्थांशी लागेबांधे असतात किंवा त्यांची स्वत:चीच संस्था असते. अनेक जण या शिक्षण सम्राटांचे नातेवाइकही असतात. त्यामुळे या दांडीबहाद्दर शिक्षकांना चाप लागण्यासाठी आता शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांवर जबाबदारी निश्चित केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.