आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकामगार दनि निमित्ताने कल्याणकारी मजुर असोसिएशन जिल्हा परिषद भवन येथे बांधकाम मजूर कुटुंबाचा सत्कार, आरोग्य तपासणी शिबिराचे आयाेजन केले होते. कार्यक्रमात बांधकाम मजुरांच्या प्रश्नांवर मंथन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष गजानन भिरड हे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे नेते चंद्रशेखर पांडे गुरुजी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, तुळशीराम गुंजकर, दिलीप शेंडे इंजनििअर, भास्कर सुलताने बिल्डर, गजानन भटकर, ऋषीकेश नावकार, सुरेश मोरे, प्रकाश लिगांटे, मो. सलिम मो., डिगांबर पिंप्राळे, अॅड. अरूण सौदागर सचनि बचे, आकाश अहिरे, विजय धांडे, अब्दुल रज्जाक शहा,उमेश सुर्यवंशी, विलास हुशे, विष्णू मानकर, चंद्रकांत लोध, दिलीप क्षीरसागर, माणिक मोरे, प्रशांत फुलारी, रामदास शिराळे, अॅड. नलनिी देशमुख उपस्थित होत्या.
मजुरांना हवी हमी : बांधकाम क्षेत्रातील मजूर, बिल्डर्स , ठेकेदाराकडून कोणत्याच प्रकारची सुरक्षीतेची हमी नाही. परिणामी जगण्याच्या कठीण परिस्थितीला आताच्या वाढत्या महागाईने त्यांना तोंड द्यावे लागत आहे, असे कल्याणकारी मजूर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष बाबूलाल डोंगरे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.