आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान विभागाचा अंदाज:अकोल्यात 19 जूनपर्यंत वादळी वाऱ्याची शक्यता; मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्यामध्ये बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शहर तसे ग्रामीण भागामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. जोराच्या वार्‍यामुळे ग्रामीण भागांमध्ये शेतीचे नुकसान संभवते आहे. अचानक आलेला मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. सायंकाळी सात वाजता पावसाला सुरुवात झाली नऊ वाजता पर्यंतही विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार 15 ते 19 दरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस व ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

विजा कडाडत असतांना अशी घ्या काळजी

वीज वादळाची स्थिती जाणवताच टिव्ही, संगणक, इ. विद्युत उपकरणे स्त्रोतापासून (स्विचबोर्ड मधून) अलग करुन ठेवावीत. वीज वादळाच्या स्थितीत मोबाईल फोनचा वापर टाळावा. घरात वा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. खिडक्या दारे बंद करावीत. झाडाखाली आश्रय घेऊ नये. वाहनावर प्रवास करीत असल्यास आपले वाहन विजेच्या खांबाजवळ वा झाडाखाली थांबवू नये. वीज कोसळल्यास मानवी हृदय व श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. अशावेळी लगेच हृदयाजवळील भागास मालिश करावे व तोंडाद्वारे श्वसन प्रक्रियेस मदत द्यावी, या कालावधीत सर्व यंत्रणांनी आपापल्या भागात दक्षता घ्यावी,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

बुधवारी मुसळधार पावसाला सुरुवात

ग्रामीण भागात मूर्तिजापुर, तेल्हारा, हिवरखेड, दानापूर, बार्शीटाकळी, पातूर येथे जोरदार पाऊस सुरू आहे. पुढले काही दिवस पावसाच्या असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजीपूर्वक रित्या बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...